महत्वाची बातमी पत्र

  • गोकुळ निवडणूक: महायुतीकडे संस्था प्रतिनिधींचे ९० टक्के ठराव असून या निवडणुकीत महायुतीच जिंकणार, असा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे.
  • एकतर्फी विजय: गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीकडे चार हजारांहून अधिक ठराव असल्याने ही निवडणूक एकतर्फी होईल, असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
  • खिद्रापूर आंदोलन: शिरोळ तालुक्यातील श्री कोपेश्वर मंदिर परिसरातील निर्बंधांविरोधात ग्रामस्थांच्या आंदोलनाला धार चढली असून गावासह शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
  • वटपौर्णिमा साजरी: जिल्ह्यात वटपौर्णिमा पारंपरिक उत्साहात साजरी झाली. सुवासिनींनी वडाला फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्य लेणं टिकावं यासाठी प्रार्थना केली.
  • कर्नाटक बेंदूर: श्रमाचे प्रतीक असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा 'कर्नाटक बेंदूर' सण उत्साहात साजरा झाला. मात्र, काही अतिउत्साही हुल्लडबाजांमुळे बैलांना त्रास झाल्याच्या घटना घडल्या.
  • कोल्हापूर पाऊस: 'यलो अलर्ट'नंतर कोल्हापुरात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
  • चलन अफवा: महात्मा गांधी मालिकेतील २००५ पूर्वीच्या नोटा ३० जूननंतर बंद होणार, ही केवळ अफवा असून बँक ऑफ महाराष्ट्रने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
  • पोलीस कारवाई: राजारामपुरी पोलिसांनी चोरीतील दागिने आणि 'डिजिटल अरेस्ट'मधून फसवणूक झालेली रक्कम हस्तगत करून मूळ मालकांना परत केली आहे.
  • दुःखद घटना: बेंदूर सणाच्या दिवशीच एका देखण्या बैलाचा मृत्यू झाल्याने कागल तालुक्यातील कुरणी गावावर शोककळा पसरली आहे.
  • कोल्हापुरातील हिल रायडर्स ॲडव्हेंचर्स फाऊंडेशनच्या अमृत महोत्सवानिमित्त यंदा सलग ७५ व्या पन्हाळा-पावनखिंड मोहिमेचे आयोजन
  • बळीराजाकडून बेंदूर सण उत्साहात साजरा, २०० वर्षांपासून सुरू असलेली कर तोडण्याची परंपरा जपली अनेक गावाने
  • चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार, २५ वर्षीय परप्रांतीय कामगार गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात
  • करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या रथासाठी लोकवर्गणीतून जमा केलेली चांदी गेली कुठे, कृती समितीचा सवाल
  • सर्व घटकांच्या अपेक्षा पाहता गोकुळची निवडणूक बिनविरोध होईल याची शक्यता कमी, आमदार विनय कोरे यांनी केलं स्पष्ट
  • गोकुळच्या निवडणुकीसाठी भाजपचे १ हजार ४३१ आणि जनसुराज्यचे ५४५ असे एकूण १ हजार ९७६ ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयात दाखल
  • इचलकरंजीत बैलांच्या लाकूड ओढण्याच्या स्पर्धेत मोठ्या गटात पंकज घोडके यांचा बैल प्रथम
  • महाडिक-नरके या दिग्गजांचा पुन्हा दोस्ताना, गोकुळच्या ऐन निवडणुकीच्या टप्प्यात सतेज पाटील यांच्यासाठी मोठा धक्का
  • धमकी दिल्याचा आणि खंडणी वसूल केल्याचा आमदार क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, रविकिरण इंगवले आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन
  • भाजपचे नगरसेवक विजयसिंह देसाई यांचा कुणबी जातीचा दाखला अवैध, कोल्हापूर जात पडताळणी समितीच्या निर्णयामुळे नगरसेवक पद धोक्यात, उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये अपील करणार, नगरसेवक देसाई यांची माहिती
  • जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला, राष्ट्रीय महामंडळाकडून १०० कोटींचा निधी मिळणार, जैन समाजातील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना आणि युवा उद्योजकांना पाठबळ मिळणार

टिप्पण्या

news.mangocity.org