विशेष बातमीपत्र

  • हिंदू मुलींना फुस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होत असल्याच्या संशयावरून इचलकरंजीत तणाव; संशयितांवर कठोर कारवाईची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी.
  • तरुणीसह चौघांची कॅफे हाऊसमध्ये दादागिरी आणि राडा; कॅफे चालक महिलेला बेदम मारहाण, कॅफेची मोडतोड. कोल्हापुरातील शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील घटना.
  • इचलकरंजीतील ३०० खाटांच्या आयजीएम रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाची मंजुरी.
  • शिक्षण घेणारे अंध विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना नॅबतर्फे मोफत शैक्षणिक साहित्य आणि शिष्यवृत्तीचे वाटप.
  • राज्यातील रेशन धान्य दुकानदार, आशा-गटप्रवर्तक महिला आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळणार; प्रस्ताव सादर करण्यासाठी आरोग्य विभाग सकारात्मक.
  • पाऊस गायब, मात्र छत्री-रेनकोट खरेदीसाठी नागरिकांची गर्दी; तर जुन्या छत्री दुरुस्त करणाऱ्यांना रोजगाराची संधी.
  • श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी झालं रोलर पूजन.
  • मजुरास मारहाण करून सव्वालाखाचा ऐवज चोरणाऱ्या इचलकरंजीतील दोन सराईत गुन्हेगारांना अटक.
  • श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्यावतीने कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात तिथीनुसार साजरा झाला ३५२ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा.
  • दिवसभर कडकडीत ऊन, पुन्हा एकदा पावसाची हुलकावणी, गेल्या २४ तासात कोल्हापूर जिल्ह्यात केवळ एक मिलिमीटर पावसाची नोंद, दिवसागणिक पाऊस वाढवतोय चिंता.
  • महाराष्ट्राला पेपर फुटीचा शाप कायम, उद्या म्हणजे रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द, राज्यातील ६ लाखांहून अधिक परीक्षार्थी उमेदवारांना धक्का.
  • रविकिरण इंगवले यांचा व्हिडीओ बॉम्ब, आमदार राजेश क्षीरसागर यांची टक्केवारीच्या कारणास्तव कंत्राटदाराला दादागिरी केल्याचे आरोप, ४० लाखांची वसुली केल्याचाही दावा, व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
  • रविकिरण इंगवले यांच्या विरोधात पाच कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार, व्हिडीओ प्रसारित करण्यात आमदार सतेज पाटील यांचाच हात, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी मांडली प्रसिद्धी पत्रकाद्वारे भूमिका.
  • आमदार राजेश क्षीरसागर यांच्या व्हिडीओ क्लिप प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे यांची मागणी.
  • भारतीय पुरातत्व विभागाच्या कारवाईविरोधात खिद्रापूर ग्रामस्थांचे धरणे आंदोलन सुरू, प्रसिद्ध कोपेश्वर मंदिरामध्ये पर्यटकांना प्रवेशबंदी.
  • सकल हिंदू समाजाकडून विशाळगडावर साजरा झाला तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन, लवकरच विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्याची नामदार नितेश राणे यांची ग्वाही.
  • सत्ता नव्हे, तर कार्यकर्ता हाच पाया समजून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल सुरू, संपर्क प्रमुख यशवंत किल्लेदार यांचे प्रतिपादन.
  • आला कर्नाटकचा बेंदूर, बाजारात आले माती आणि प्लास्टरचे सुबक बैल, सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी हौशी पशुपालकांची गर्दी.
  • टिप्पण्या

    news.mangocity.org