आजचे बातमी पत्र

  • कौटुंबिक कलहाचा दुर्दैवी शेवट आत्महत्येमध्ये; मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबलची चंदगड तालुक्यात आत्महत्या.
  • कोल्हापुरातील माळी समाजाच्यावतीने गुणवंत विद्यार्थी गौरव, शैक्षणिक साहित्य वाटप आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर; १६०० पोलीस अधिकारी-कर्मचारी, ८ क्यूआरटी, ३ आरसीपी टीम, ४०० होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात.
  • MH-09 क्रमांकाची वाहने वगळून अन्य वाहनांवर प्रवेशकर आकारण्याचा प्रस्ताव महापालिका सभेत मागे; पाणीपट्टी दराबाबतचा प्रस्ताव पुढील सभेत घेण्याचा निर्णय.
  • शासनाच्या अतिक्रमण नियमितीकरण धोरणानुसार पात्र निवासी अतिक्रमणे मालकी हक्काने करून देण्याबाबतच्या ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी.
  • हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मोहरम सणाला प्रारंभ; विविध दर्ग्यांत कुदळ पाडण्याचा धार्मिक विधी आणि ठिकठिकाणी पीर पंजांची प्रतिष्ठापना.
  • कोल्हापूर डिस्ट्रीक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्यावतीने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला मोठा प्रतिसाद.
  • कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर आणि भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र यांच्यावतीने २१ जूनला वसंत-बहार रोडवरील नन्हे लॉनमध्ये योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
  • घरफाळा घोटाळ्यातील संजय भोसले यांनी दोषमुक्त करण्यासाठी न्यायालयात दाखल केलेला अर्ज नामंजूर; भोसले यांना निलंबित करण्याची भूपाल शेटे यांची मागणी.
  • हुपरी नगरपरिषदेमधील भाजपच्या नगरसेविका माधुरी सुनील मुधळे यांचा जातीचा दाखला ठरला अवैध; परिसरात खळबळ.e
  • कोल्हापूर शहरातील पाणी टंचाईच्या विरोधात महापालिका सभेत नगरसेवक आक्रमक, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर ओढले ताशेरे
  • मान्सूनचं आगमन लांबणीवर, धरणांत साठलेला प्रचंड गाळ आणि पाणी पुरवठ्याचं योग्य नियोजन नसल्यानं कोल्हापूर शहरात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर
  • न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या राष्ट्रीय शिखर संघटनेकडून सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये झाली दोन दिवसांची कार्यशाळा, मोया-मोया आजारावरील ब्रेन बायपास शस्त्रक्रियेच्या प्रात्यक्षिकांनी वैद्यकीय क्षेत्र प्रभावित
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर यशस्वी, शिवसेना ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदारांनी स्थापन केला स्वतंत्र गट, तर आमदारांचा एक गटही फुटण्याची शक्यता
  • पाण्याच्या प्रवाहाच्या वेगावर चालणारा अनोखा पंप, ठिकपुर्लीच्या तुकाराम चौगले यांची भन्नाट कल्पना... वीज किंवा इंधनाविना ऊस शेतीला मिळतंय मुबलक पाणी
  • फास्टटॅगच्या स्कॅनिंगवरून झालेल्या वादातून ट्रक चालकाला बेदम मारहाण, कागल सीमा तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यालाही मारहाण झाल्याचा व्यवस्थापनाचा दावा
  • गोकुळच्या निवडणुकीसाठी २६० संस्था प्रतिनिधींचे ठराव दाखल, ठरावधारक संबंधित प्राथमिक दूध संस्थेचा सभासद असणं आवश्यक
  • दूधगंगा नदीपात्रातील ते दगडी बांध कुणी आणि कशाबद्दल घातले, स्थानिक नागरिकांकडून चौकशीची मागणी
  • कोल्हापूर शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आता विभागीय कार्यालय स्तरावर अधिकार, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी केलं अधिकाराचं विकेंद्रीकरण

टिप्पण्या

news.mangocity.org