चिन्मय वैद्य याला पुरस्कार मिळवून देणारी एक अभिमानास्पद कामगिरी


चिन्मय वैद्य याला पुरस्कार मिळवून देणारी एक अभिमानास्पद कामगिरी पुणे येथे पार पडलेल्या कला स्पर्धेत समोर आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये गावचा सुपुत्र आणि पटवर्धन हायस्कूलचा माजी विद्यार्थी असलेल्या चिन्मय वैद्य याने पुणे येथे आयोजित २३ व्या राज्यस्तरीय प्रत्यक्ष न्यूड लाईफ चित्रण स्पर्धा २०२६ मध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवला आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील अनेक नवोदित कलाकारांनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये चिन्मयच्या कलाकृतीने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून कला शाखेचे शिक्षण

चिन्मय वैद्य याने नुकतीच मुंबईतील नामांकित सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून फाईन आर्ट (Fine Art) या विषयाची पदवी परीक्षा दिली आहे. उच्च कला शिक्षणाचे धडे गिरवत असतानाच त्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर कला क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरवात केली आहे. व्यावसायिक कला जगतात अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या लाईफ स्केचिंग प्रकारात त्याने मिळवलेले हे यश त्याच्या सातत्यपूर्ण अभ्यासाची प्रचिती देते



टिप्पण्या