आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या

  • मान्सूनचं आगमन लांबणीवर, अनेक ठिकाणी पंचगंगा नदीचं पात्र कोरडं, नदी पात्रातील प्राचीन मंदिरं झाली खुली, तर कळंबा तलावानेही गाठला तळ.
  • खाबुगिरीचा कळस, पन्हाळा नगरपरिषदेने २५ लाखात लावली केवळ ३४ झाडं, वृक्षारोपणात लाखोंचा घोटाळा झाल्याचा नागरीकांचा आरोप.
  • स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता ६ महिन्यांची अंतिम मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
  • शिरोली औद्योगिक वसाहतीत धुमाकूळ घालणारे दोन चोरटे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले जेरबंद, २५ लाख ३६ हजारांचे साहित्य जप्त.
  • सहाय्यक निबंधकांनी सुनावणी घेतलेल्या १ हजार ५३ पैकी, साधारण ६६१ प्राथमिक दूध संस्था गोकुळच्या निवडणुकीसाठी अपात्र, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट.
  • काळम्मावाडी धरणातील पाणी पातळी खालावली, कोल्हापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत, धरणातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू.
  • कोल्हापुरातील टेंबलाईवाडी परिसरातील रिक्षाचालक साद पठाण याच्या खून प्रकरणातील संशयितांची पोलिसांनी काढली धिंड.
  • कोल्हापुरातील आयटीआय परिसरात लाखो लिटर पाणी जातंय वाया, एकिकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे महापालिकेच्या गलथान कारभारामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय.
  • शासकीय मुद्रणालयातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काळ्या फिती लावून निदर्शनं, १८ जूनला लाक्षणिक संपाचा इशारा.
  • करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली इथल्या सरदार गल्लीत चोरट्यांनी ४ घरं फोडली, दोन कुटुंबातील ११ तोळे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये नेले चोरून, अन्य दोन ठिकाणचा चोरीचा प्रयत्न फसला
  • कळंबा, पाचगांवसह कोल्हापूर शहराच्या काही भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या कळंबा तलावाच्या पाण्यानं गाठला तळ, ऐतिहासिक शाहूकालीन विहीर आली उघड्यावर
  • अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर, पहिल्या यादीच्या तुलनेत अत्यल्प प्रतिसाद, केवळ ८३९ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
  • अन्न आणि औषध प्रशासनाकडून सुरु असलेल्या कारवाईच्या समर्थनासाठी कुरुंदवाडमध्ये झाला चक्क आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • स्वयंसिद्धा आणि डॉ. व्ही. टी. पाटील फौंडेशनच्यावतीने झाला स्वयंसिद्धा पुरस्कार सोहळा, सुधा कोठारी यांना १ लाख रूपयांचा कांचनताई परुळेकर स्मृतीगौरव पुरस्कार प्रदान
  • दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेला प्रारंभ, कोल्हापूर विभागातून ११ हजार विद्यार्थी देतायत पुरवणी परीक्षा
  • भंगारात निघालेल्या कचरा उचलणाऱ्या गाड्यांचं महापालिकेच्या वर्कशॉप विभागाने केलं रूपांतर, आता अतिक्रमण पथकासाठी वापर होणार, टाकाऊपासून टिकाऊ उपक्रमाचं यश
  • विविध मागण्यांसाठी घरगुती कामगारांचा इचलकरंजीतील साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर निघाला मोर्चा
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका ॲक्शन मोडवर, श्री अंबाबाई मंदिर परिसरात राबवली अतिक्रमण निर्मूलन मोहीम
  • अवैध सावकारीच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबांना न्याय देण्याच्या मागणीसाठी इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर निघाला महिलांचा मोर्चा
  • विविध मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला एक दिवसाचा लाक्षणिक संप, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बेमुदत संपाचा इशारा

टिप्पण्या

news.mangocity.org