आजच्या ठळक घडामोडी

  • शैक्षणिक वर्षाची सुरुवात: उन्हाळी सुट्ट्यांनंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
  • दूध संस्थांवर कारवाई: अवसायान प्रक्रियेतील ६५० दूध संस्था अपात्र ठरल्याचा निर्णय दुग्ध विभागाच्या सहाय्यक निबंधकांनी घेतला आहे.
  • पंचगंगा प्रदूषण आंदोलन: प्रदूषणाविरोधात 'अंकुश' संघटना आक्रमक झाली असून, आंदोलकांचे पोलिसांशी झटापट झाली. नगरपालिकेत ठिय्या आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
  • आरक्षणाचा मुद्दा: मनोज जरांगे-पाटील यांनी कोल्हापूर गॅझेटसह ऐतिहासिक कागदपत्रांची दखल घेण्याची मागणी केली असून, मराठा आरक्षणाचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे.
  • शेअर बाजारात तेजी: आखाती देशांतील युद्धविरामानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ झाली. सेन्सेक्स ७३६ अंकांनी तर निफ्टी २३१ अंकांनी वधारला, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८ लाख कोटींची भर पडली.
  • अतिक्रमणांवर कारवाई: करवीर तालुक्यातील शिये येथील हनुमाननगर परिसरात २८ अतिक्रमित बांधकामे प्रशासनाकडून हटवण्यात आली आहेत.
  • ऑनलाइन उपस्थिती अनिवार्य: राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आता ऑनलाइन पद्धतीने नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा मेघराज राजेभोसले यांची निवड, पारदर्शक कारभार करून सभासदांना विविध सेवासुविधा देऊ, राजेभोसले यांची माहिती
  • शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीमध्ये दत्त दर्शनासाठी आलेल्या इचलकरंजीतील तरुणाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू
  • केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या इचलकरंजी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभास्थळाची केली पाहणी
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा २० जूनचा कोल्हापूर दौरा अभूतपूर्व आणि भव्यदिव्यपणे यशस्वी करावा, खासदार धनंजय महाडिक यांचं पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन
  • कळंबा इथं सापळा रचून गोवा बनावटीची मद्य, वाहन आणि मोबाईल असं ८ लाख ७७ हजार रुपयांचं साहित्य जप्त, चालकाला अटक, करवीर पोलिसांची कारवाई
  • पर जिल्ह्यातून कोल्हापूर शहरात येणाऱ्या वाहनांवर प्रवेश कर आकारण्याचा ठराव नामंजूर करण्याचा महायुतीच्या पार्टी मीटिंगमध्ये निर्णय
  • कसबा सांगाव मधील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवागतांचं स्वागत आणि दहावीतील गुणवंतांचा झाला गुणगौरव
  • कोल्हापुरातील सारंग चषक राष्ट्रीय कॅरम स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न
  • टिप्पण्या

    news.mangocity.org