आजच्या घडामोडी

  • शक्तीपीठ महामार्ग विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला भव्य मोर्चा, प्रसंगी रक्ताचे पाट सांडू, पण शक्तीपीठ होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार.
  • पूर्व वैमनस्यातून शोएब पठाण या २३ वर्षीय रिक्षा चालकाचा टेंबलाईवाडीत निर्घृण खून, संशयित ५ जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात.
  • मागील कर्जमाफीचा लाभ मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांनाही अहिल्यादेवी होळकर पीक कर्जमाफीचा लाभ मिळणार, मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, १४ हजार कोटी रुपयांची तरतूद.
  • दुग्धविकास विभागाने गोकुळच्या मतदार यादीच्या ठरावाचा मसुदा पाठवल्याने ४२७ दूध संस्थांची याचिका सर्किट बेंचने काढली निकाली.
  • पावसाचे पाणी बिळात शिरल्याने नागरी वस्तीत साप शिरण्याचे प्रमाण वाढले, नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे, सर्पदंश झाला तर ताबडतोब सरकारी रुग्णालयात दाखल होणे आवश्यक.
  • कोल्हापूरच्या अन्न-औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाला केराची टोपली, राज्यात धडाधड कारवाया सुरु असताना कोल्हापूरचा अन्न-औषध प्रशासन विभाग ढिम्म.
  • राज्यातील प्रत्येक शाळेने किमान ५० झाडे लावणे बंधनकारक, ॲपद्वारे नियमित माहिती पाठवावी लागणार, केंद्र शासनाच्या वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शाळांना सक्ती.
  • अलनिनोचा प्रभाव सुरू, भारतातील उष्णता वाढणार, तर एकाच वेळी ओल्या आणि कोरड्या दुष्काळाचा धोका.
  • यंदा खरीपाखाली येणार जिल्ह्यातील ३ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्र, रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे यांची माहिती.
  • शेतकरी सहकारी संघ निवड: शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी भाजपचे दत्तात्रय राणे यांची, तर उपाध्यक्षपदी आमदार चंद्रदीप नरके गटाचे परशुराम कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
  • अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २१ जून रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त खासदार धनंजय महाडिक यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक घेतली.
  • शैक्षणिक साहित्य वाटप: कोल्हापूर धान्य व्यापारी संस्था प्रेरित बालकल्याण संस्थेच्या वतीने १,२०१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सलग १०४ वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
  • इचलकरंजी प्लास्टिक बंदी: शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी २० जूनपासून इचलकरंजीत प्लास्टिक बंदी लागू करण्यात येणार आहे.
  • सौर ऊर्जा प्रकल्प: करवीर तालुक्यातील हलसवडे येथील महापालिकेच्या २५ एकर जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असून, आयुक्त राजेंद्र भारूड यांनी अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत.
  • बस थांबा हस्तांतरण: इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीने सोन्या मारुती चौकात उभारलेला बस थांबा कोल्हापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला.
  • पिंक ऑटो रिक्षा: मार्व्हलस ग्रुप आणि इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज यांच्या वतीने एका गरजू महिलेला पिंक ऑटो रिक्षा प्रदान करण्यात आली.
  • रस्ता रुंदीकरणाला विरोध: बालिंगा पुलाजवळ रस्ता रुंदीकरणाचे काम दोनवडेच्या शेतकऱ्यांनी बंद पाडले. योग्य भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.
  • महात्मा बसवेश्वर विचार: शरण साहित्य अध्यासनाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांचे विचार समाजापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचतील, असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.

टिप्पण्या