आजच्या दिवसभरातील घडामोडी

  • गॅस दरवाढ: इराण आणि अमेरिका युद्धाच्या सावटाखाली घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ झाली आहे.
  • राजकीय इशारा: जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईची किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल, असा इशारा खासदार शरद पवार यांनी दिला आहे.
  • साखर कारखाने: साखर कारखान्यांच्या ऊर्जित अवस्थेसाठी अमित शहा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
  • पाऊस अंदाज: राज्यात पुढील ४८ तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज असून २१ जिल्ह्यांना यलो अलर्ट तर सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
  •  कोल्हापूर महापालिकेत जन्म-मृत्यू नोंदणी कामात अडथळे, माल वाहतूक भाड्यात ३५ टक्के वाढीची मागणी आणि पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत शिवसेनेचा मोर्चा.
  • कोल्हापूर: गंगावेस परिसरातील बापट बोळमधील अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त.
  • शहर विकास: कोल्हापूर शहरातील मोकळ्या जागा विकसित करण्यासह अंबाबाई मंदिर परिसर आणि शहर अतिक्रमण मुक्त करण्यावर भर देणार; आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची माहिती.
  • वाचन चळवळ: कॉग्रेड गोविंद पानसरे लिखित, 'शिवाजी कोण होता...' या पुस्तकाचे ऐतिहासिक बिंदू चौकात सामूहिक वाचन पार पडले.
  • महत्त्वाचा निर्णय: महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या लढ्याला यश; राज्य शासनाचा प्रस्तावित देवस्थान इनाम जमीन कायदा विधेयक रद्द.
  • तपास: महाविद्यालयीन विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणात तपासाला वेग; आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे डिजिटल पुरावे हस्तगत.
  • वारसा: ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे संशोधन कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी डॉ. मंजुश्री पवार यांच्यावर; खासदार शरद पवार यांची अपेक्षा.
  • ग्राहक हित: खाद्यतेल आता ठराविक वजनातच मिळणार; ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि उत्पादकांना एकाच नियमात बसवण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय.
  • शेतकरी: बळीराजासाठी महत्त्वाची बातमी; शेतकरी कर्जमाफीचे पैसे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार.
  • शिक्षण भरती: राज्यात १३ हजार शिक्षकांच्या पदांसाठी भरती होणार; 'पवित्र पोर्टल'च्या माध्यमातून प्रक्रिया पार पडणार.
  • शिवराज्याभिषेक: कोल्हापुरातील 'मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान'च्या वतीने विशालगडावर विविध उपक्रमांनी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न.
  • क्रीडा: समरजित जितकर या बाल स्केटिंगपटूचा इनलाईन स्केटिंगमध्ये राष्ट्रीय विक्रम.

टिप्पण्या