मुख्य सामग्रीवर वगळा
आजच्या घडामोडी
- तावाडे हॉटेलकडून कोल्हापूरकडं येणारी तवेरा कार छोट्या पुलावरून शेतवडीत कोसळली, कारखाली दबून कावळा नाका इथल्या २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू, अन्य तिघे जण जखमी.
- अकरावी प्रवेशाच्या पहिल्या ऑनलाईन फेरीत नाव नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी थंड प्रतिसाद, आजअखेर केवळ १४ हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश.
- कोल्हापूरसह राज्यातील निळ्या आणि लाल पूर रेषांचं सर्वेक्षण करण्यासाठी शासनानं नियुक्त केलेली समिती केवळ कागदावरच, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांचा दावा.
- परप्रांतीयांची घुसखोरी आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाहूपुरी पोलीस आणि रेल्वे पोलिसांची कोल्हापूरच्या छत्रपती शाहू टर्मिनसवर तपासणी मोहीम.
- प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचऱ्यामुळं कागल शहरातील गटारी तुंबल्या, नागरिकांनी शिस्त पालन करण्याची गरज.
- शाहूवाडी तालुक्यातील येळाणे इथं रिक्षा आणि मोटारसायकलची धडक, ४५ वर्षांच्या सचिन कदम यांचा जागीच मृत्यू.
- टिपर चालकांनी अचानक पुकारलेला संप खाजगी ठेकेदार कंपनीला भोवला, ६ खाजगी ठेकेदार कंपन्यांना आयुक्तांनी ठोठावला तब्बल २२ लाख रुपयांचा दंड.
- मान्सून केरळच्या उंबरठ्यावर, महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची स्थिती, १२ जूननंतर मान्सून महाराष्ट्र व्यापणार, तापमानाचा पारा घसरल्याने नागरिकांना तीव्र उकाड्यापासून दिलासा.
- विनायक संकष्टी चतुर्थी: अधिक मासातील संकष्टीनिमित्त गणेश मंदिरात भाविकांची गर्दी; छत्रपती शिवाजी महाराज चौकात अथर्वशीर्ष पठण आणि २१०० आंब्यांची आरास.
- शिवराज्याभिषेक सोहळा: देशभरातील नद्यांचे पवित्र जल कोल्हापूर हायकर्सतर्फे रायगडावर नेले जाणार.
- चित्रपट महामंडळ निवडणूक: 'चित्रकर्मी पॅनेल' रिंगणात; कलाकार मानधन, पेन्शन आणि घरकुल योजना राबवणार असल्याचे अभिनेते आनंद काळे यांनी सांगितले.
- पुलाची शिरोली येथील खुनाचा २४ तासांत उलगडा; फिर्यादी मुलानेच वडिलांचा खून केल्याचे स्पष्ट, दोन आरोपींना अटक.
- ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या आकाश राठोडला अटक; ४ लाख १६ हजारांचे साहित्य जप्त.
- लहान मुलांच्या फुटबॉल सामन्यादरम्यान झाडू कामगारावर हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल.
- आंदोलन: इचलकरंजीतील प्रोसेस युनिट्स सुरू करण्यासाठी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा.
- पाणी नासाडी: नागाळा पार्क येथील जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया.
- प्रशासन: तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील अतिक्रमित बांधकामे २० जूननंतर हटवणार.
- प्राण्यांचा हल्ला: राधानगरी तालुक्यात कोल्ह्याचा धुमाकूळ; दहा जखमी जनावरांवर सीपीआरमध्ये उपचार
- पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं महिलेच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रुपये किमतीचं गंठण हिसडा मारून नेलं चोरून, कोल्हापुरातील पाटोळेवाडी इथली घटना.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा