पद मोठं नसतं… माणुसकी मोठी असते.

स्वतः अर्ज लिहून… स्वतःचं काम करून देणारे अधिकारी आजच्या काळात फार कमी पाहायला मिळतात. पण किरण सामंत यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की, पद मोठं नसतं… माणुसकी मोठी असते.

सामान्य नागरिक अडचणीत असताना अनेकदा सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. कुठला अर्ज, कोणती प्रक्रिया, काय कागदपत्रे… यामध्ये अनेक लोक गोंधळून जातात. अशा वेळी स्वतः पुढाकार घेऊन अर्ज लिहून देणे, समजावून सांगणे आणि नागरिकांचे काम आपल्या माणसासारखे करून देणे हीच खरी लोकसेवा आहे.

किरण सामंत यांची ही साधी पण मनाला भिडणारी कार्यशैली लोकांच्या मनात विश्वास निर्माण करते. खुर्चीत बसून आदेश देणं सोपं असतं, पण लोकांमध्ये बसून त्यांची समस्या ऐकणं आणि ती सोडवण्यासाठी स्वतः हातभार लावणं हे मोठेपणाचं लक्षण आहे.

आज अनेकांना “काम होईल का?” अशी भीती वाटते, पण किरण सामंत यांच्यासारखे लोक आशेचा किरण ठरतात. स्वतः अर्ज लिहून देताना दिसलेला हा क्षण म्हणजे केवळ एक फोटो नाही, तर जनतेशी जोडलेलं नातं, संवेदनशीलता आणि सेवाभावाचं सुंदर उदाहरण आहे.

“स्वतः अर्ज लिहून… स्वतःच काम करून देणारे भैया… Great!”
ही भावना आज अनेकांच्या मनात आहे. 🙏

प्रविण किणे

टिप्पण्या