आज चे बातमी पत्र

  • पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका: पेट्रोल प्रतिलिटर ३ रुपये १४ पैसे, तर डिझेल प्रतिलिटर ३ रुपये ११ पैशांनी महाग.
  • गोकुळ दूध संघ निवडणूक: महायुती म्हणून गोकुळ दूध संघाची निवडणूक लढणार, गोकुळवर महायुतीचीच सत्ता येणार; साखर निर्याती प्रश्नी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांनाही भेटणार - नामदार हसन मुश्रीफ यांचा ठाम दावा.
  • साखर निर्यात बंदी: साखर निर्यात बंदीतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार, वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान आणि नामदार अमित शहा यांच्याकडे प्रश्न मांडणार.
  • मान्सूनचे आगमन: मान्सूनचा वेग वाढला, पुढील २४ तासांत अंदमानात होणार दाखल, २६ मे पर्यंत केरळमध्ये आणि तिथून सात ते आठ दिवसांत कोकण किनारपट्टीत पोहोचण्याचा हवामान खात्याचा अंदाज.
  • नीट (NEET) परीक्षा: पेपर फुटीमुळे रद्द झालेली नीट युजीची फेरपरीक्षा २१ जून रोजी होणार, तर पुढील वर्षापासून नीट परीक्षा ऑनलाईन होणार.
  • इंधन बचत मोहीम: इंधन बचत हीच राष्ट्रसेवा; जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती आणि अधिकाऱ्यांनी केला बसने प्रवास. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून इलेक्ट्रिक वाहनाचा वापर, पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद.
  • ई-चलन दंड माफी: ई-चलन दंड माफीसंदर्भात प्रदीप राठोड यांच्या आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी विविध व्यक्ती, संस्था, संघटनांचा वाढता पाठिंबा; उपोषणकर्ते प्रदीप राठोड यांची प्रकृती खालावली.
  • कोल्हापूर हद्दवाढ: २०२७ च्या जनगणनेनंतर कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणारच; आमदार राजेश क्षीरसागर यांचा विश्वास.
  • चांदी बाजारपेठ: चांदीला मिळाली झळाळी, हुपरीच्या बाजारपेठेत पुन्हा चैतन्य; अधिक मासामुळे उद्योगाला मिळणार उभारी.
  • चित्रपट: साखळी बॉम्बस्फोटातील आरडीएक्सचा शोध घेणारा 'मिशन' हा मराठी चित्रपट आजपासून प्रदर्शित झाला आहे.
  • क्रीडा: महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाने दुसऱ्या उपांत्य सामन्यात ३-० ने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली.
  • शिक्षण: माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून सुरू होणार आहे.
  • विरोध: राज्य शासनाच्या 'महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मुलन' कायद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघाने विरोध केला असून, १८ मे पासून हरकती नोंदवण्याची मोहीम सुरू होणार आहे.
  • आरोग्य: इंडोकाउंट फाउंडेशनने 'सी एस आर'च्या माध्यमातून क्षयरुग्णांना मोठा आधार दिल्याचे मत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी व्यक्त केले.
  • अपघात: विविध आपत्तींना धैर्याने तोंड देणारे पोलीस हवालदार संताजी चव्हाण यांच्या मुलाचा मिरज जवळील अपघातात मृत्यू झाला असून हवालदार चव्हाण यांची प्रकृती गंभीर आहे.
  • सहकार: अपात्र ठरलेल्या दूध संस्थांबाबत तालुकावार निकाल न देता एकत्रित निकाल द्यावा, अशी मागणी करवीर दूध संस्था प्रतिनिधींनी केली आहे.
  • गुन्हेगारी: कोल्हापुरातील राजारामपुरी माऊलीचा पुतळा परिसरात झालेल्या हाणामारी प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
  • कारवाई: हातकणंगले तालुक्यातील मजले येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत ४० लाखांच्या दारूसह कंटेनर जप्त केला आहे.
  • वन्यजीव: शाहूवाडी तालुक्यातील आकूर्ले येथील वाघवाडी वस्तीत बिबट्याने शर्यतीच्या घोड्यावर हल्ला करून त्याला ठार केले.

टिप्पण्या