रत्नागिरी जिल्ह्यात देखील शत प्रतिशत भाजप होणार, कार्यकर्त्यांनी जोमाने पक्ष बांधणीच्या कामाला लागावे, आमदार प्रमोद जठार यांचे राजापुरात जंगी स्वागत

भारतीय जनता पक्षाने मला विधान परिषदेची आमदारकी दिली. त्याचे सर्व श्रेय भाजपाच्या सर्व संघटनांचे कार्यकर्त्यांचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आपल्याला पक्ष बांधणी करायची आहे. सरकार हे महायुती म्हणून चालते आहे परंतु भाजप पक्ष महायुती म्हणून चालत नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाचे जोमाने काम करावे. तसेच नवीन येणाऱ्या लोकांचे आनंदाने स्वागत करावे असे आवाहन नवनियुक्त विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी राजापूर येथे केले. 

आमदार प्रमोद जठार शनिवारी राजापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जवाहर चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनाही अभिवादन केले. यावेळी राजापूरच्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार प्रमोद जठार यांचे जंगी स्वागत केले. यावेळी भाजप कार्यालय छोटे खानी सभा पार पडली.

यावेळी आमदार प्रमोद जठार म्हणाले की, भारतातील १९ राज्यांमध्ये आज भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल आणि आसामच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपाने घवघवीत यश प्राप्त केले असून त्या ठिकाणी सत्ता स्थापन केली आहे. हे सर्व यश कार्यकर्त्यांमुळे भाजपला प्राप्त होत आहे. नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे. कारण ते भाजप मध्ये आले आहेत. त्यात कुणीही हेवेदावे करू नयेत. संघाचा नियमच आहे की जे येतील त्यांना आपल्यासोबत घ्या आणि राष्ट्राला, पक्षाला अपेक्षित असे त्यांना घडवा. आपले विचार रुजवण्याचे काम आपण करायचे आहे. आज शून्यातून विश्व निर्माण होत आहे. पण अशा परिस्थितीत आपण सावधही राहायचे असते. नजर हटी तो दुर्घटना घटी. असे होता कामा नये. रत्नागिरी जिल्ह्यात देखील भाजपची सत्ता येणार आहे. तुम्ही चिंता करू नका. तुम्ही तुमच्या कार्यावर विश्वास ठेवा. भाजपचे राष्ट्रीय नेते पश्चिम बंगाल, आसाम मध्ये सत्ता घेऊ शकतात तर रत्नागिरी काय आहे. इथे सुद्धा भाजप शत प्रतिशत स्थापन होणार. असे प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केले आहे.

या सभेवेळी रत्नागिरीचे भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड. विलास पाटणे, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हा सरचिटणीस ओमकार फडके, जिल्हा पदाधिकारी बावा नाचणकर, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्रुती ताम्हणकर, राजापूर भाजप तालुकाध्यक्ष मोहन घुमे, एकनाथ मोंडे, पंचायत समिती उपसभापती अभिजित गुरव, माजी नगरसेविका शीतल पटेल, भाजप महिला आघाडी जिल्हा पदाधिकारी शिल्पाताई मराठे, नगरसेविका सुयोगा जठार, भाजप पदाधिकारी अनिल करंगुटकर, संदीप तेरवणकर, संदेश विचारे, भास्कर सुतार, शीतल रहाटे, स्नेहा रहाटे, शहर अध्यक्ष किरण शिवलकर, विवेक गुरव, नागेश शेट्ये, बाळ दाते, अमोल सीनकर, चंद्रकांत लिंगायत, राजा नलावडे, फारुख साखरकर, प्रदीप गांधी, विनायक कदम आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या