मुख्य सामग्रीवर वगळा
आजच्या ठळक घडामोडी
- दहावीचा निकाल जाहीर: माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल ९२.०९% लागला असून, कोल्हापूर विभागाचा निकाल ९५.४७% इतका आहे.
- कागल सीमा तपासणी नाक्यावर राडा: बॅरिकेट्स लावण्यावरून मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार प्रकाश बेलवाडे यांनी केली. तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारा संदेश प्रसारित केल्याबद्दल बेलवाडेंसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- कबनूर येथील खून प्रकरण: मद्यपी पतीच्या छळाला कंटाळून पत्नी आणि मुलांनी मिळून पतीचा खून केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
- गोकुळ संघ प्रशासक मंडळ: "दाल में कुछ काला है" असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी गोकुळ संघावरील प्रशासक मंडळाच्या नियुक्तीचे समर्थन केले आहे.
- लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षा: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला न्यायालयाने २० वर्षांची सक्त मजुरी सुनावली आहे. हा प्रकार २०१३ ते २०१९ दरम्यान राधानगरी तालुक्यात घडला होता.
- इचलकरंजीत चोरी: बंद घराचे कुलूप तोडून १० लाख १५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली. ही घटना टाकवडे रोड परिसरात घडली.
- यंत्रमाग कामगारांचे आंदोलन: इचलकरंजीत मजुरीवाढ प्रश्नी आयोजित मेळाव्यात मतभेद झाले. संतप्त यंत्रमागधारकांनी असोसिएशनचे प्रवेशद्वार बंद करून जोरदार घोषणाबाजी केली.
- महिला स्वच्छतागृहांचे लोकार्पण: खासबाग मैदान आणि ताराबाई पार्क येथील 'वुलू' महिला स्वच्छतागृहांचे रविवारी लोकार्पण होणार आहे. कृष्णराज महाडिक यांनी या कामाची पाहणी केली.
- राज्यात प्रो-लिग कुस्ती: कुस्तीच्या विकासासाठी आयपीएलच्या धर्तीवर राज्यात 'प्रो-लिग कुस्ती' स्पर्धा सुरू करणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
- कागल बसस्थानक प्रश्न: कागल बसस्थानकाचे काँक्रीटीकरणाचे काम रखडल्याने स्थानिक दहा खोकीधारक आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून त्यांचा व्यवसाय बंद आहे.
- तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील विनापरवाना व्यवसायधारकांची दुकानं सील करावीत, स्थायी समिती सभेत प्रशासनाला सूचना
- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करावी, ठाकरे गट शिवसेनेची मागणी
- मुरगुड बाजारपेठ मार्गावर लूटमार करणाऱ्या दोघा सराईतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अतिग्रेजवळ केली अटक, ३ लाख ११ हजारांचे दागिने जप्त
- कोल्हापूर शहरातील अधिकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड पास देणार, बेकायदा विक्रेत्यांवर कारवाई होईल, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची माहिती
- शालांत परीक्षा मंडळाने आज जाहीर केलेल्या दहावीच्या निकालामध्ये क्रीडा नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात घेतला आखडता हात, क्रीडा ग्रेस गुणांपासून अनेक विद्यार्थी वंचित
- गेल्या ८ महिन्यांपासून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनेचा व्याज परतावा रखडला, लाभार्थी मराठा तरुण आर्थिक अडचणीत
- कोल्हापूर शहरातील नागरिकांची कामं विभाग स्तरावर होण्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण करणार, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची माहिती
- तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामाबाबत कायदेशीर सल्ला घेऊन १५ दिवसांची नोटीस देणार, परवाना नसल्याने व्यवसाय बंद करण्याच्या कारवाई बाबतही विचार, आयुक्तांची माहिती
- राधानगरी तालुक्यातील कोनोली पैकी फालेवाडा इथल्या शेत जमिनीच्या वादातून सूरज फाले यांच्या खून प्रकरणातील संशयित बापू फाले याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून कोल्हापुरातील गंगा ई लॉनजवळ अटक
- महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा संघाचा फुलेवाडीवर, तर उत्तरेश्वर पेठेचा जुना बुधवार पेठवर टायब्रेकरवर विजय
- महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर आणि पुणे संघ अंतिम फेरीत, शनिवारी छत्रपती शाहू स्टेडियमवर रंगणार अंतिम सामना
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा