रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या, सत्ताधारी नेते मंडळी जिल्हावासियांना महागाईचा त्रास होणार नाही म्हणून काय प्रयत्न करत आहेत?
रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्रोल साठा कमी झाला असल्याने पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. कधी रेग्युलर पेट्रोल मिळत नाही..तर कधी रेग्युलर आणि स्पीड पेट्रोल दोन्हीही मिळत नाही. त्यामुळे लोकांना तसेच ताटकळत परत घरी जावे लागत आहे. शेतकऱ्यांना कॅन किंवा बाटल्यांमध्ये पेट्रोल मिळत नाही. त्यामुळे ग्रास कटर आणि अन्य पेट्रोलवर चालणारी अवजारे कशी चालवायची हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. सी एन जी स्टेशन वर देखील लोकांच्या रांगाच्या रांगा पाहायला मिळत आहेत. मात्र एवढे होत असताना देखील शिवसेना-भाजप महायुती मधील एकही नेता जनतेच्या बाजूने एक शब्द सुद्धा काढताना दिसून येत नाहीये. निवडणुका आल्या की घोषणांचा पाऊस होतो मात्र लोकांना वारंवार पेट्रोल पंपावर तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे. आता पुन्हा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या आहेत त्यावर देखील कोकणातले एकही नेता काही बोलताना दिसून येत नाही.
कोकणातल्या विशेषतः जनतेच्या छोट्या छोट्या प्रश्नांवर निवडून येणारे नेते काहीच का बोलत नाही हा पुन्हा पुन्हा प्रश्न पडत आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या असून कोकणातल्या शेतकऱ्यांवर विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकरी व मच्छीमारावर महागाईचे मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे. पेट्रोल डिझेल चे दर वाढले तर आंबा, काजू यासाठी लागणारी खते, पावसाळी शेतीसाठी लागणारे बी, बियाणी यामध्ये काही किमतीमध्ये वाढ होणार आहे का याबाबत संबंधित विभागांनी शेतकऱ्यांना वेळीच सूचित केले पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यात महागाई वाढली तर सगळ्या वस्तू महागणार आहेत. गणपतीसाठी लागणारी मातीच्या किमती वाढणार आहेत का हे देखील जनतेला आणि गणपती मूर्ती बनणाऱ्या व्यावसायिकांना कळले पाहिजे.
जिल्ह्यात आंबा पोळी, फणस पोळी, आमसुले, कोकम सिरप, मँगो पल्प, काजू गर, हे प्रकिया पदार्थ बनवले जातात. असे काही उद्योग आहेत. मात्र पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे या व्यावसायिकांवर काही परिणाम होणार आहेत का. कारण वरील प्रक्रिया पदार्थ बनवण्यासाठी साखर, मीठ, मशिनरी, अन्य रॉ मटेरियल आवश्यक असते. मात्र यांच्या किमती वाढल्या तर शेतकरी प्रक्रिया केलेले पदार्थ कसे तयार करणार आणि त्यांच्या पुढे जाऊन मार्केट मधल्या किमती काय असणार हे देखील शेतकऱ्यांना कळले पाहिजे.
मात्र या सगळ्या प्रश्नांकडे कोकणातील सत्ताधारी काहीच बोलताना दिसून येत नाहीत. जिल्हा नियोजन समिती मध्ये किती पैसे शिल्लक राहिले आहेत. किती निधी पायाभूत विकास प्रकल्पांवर, रस्ते, पाखाड्या, संरक्षक भिंती यांच्यासाठी खर्ची केले हे जनतेला कळले पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला महागाईचा फटका जिल्हा वासियांना बसू नये म्हणून शासनकर्ते म्हणून काय तजवीज केली आहे ते देखील शासनकर्त्यांनी सांगितले पाहिजे. मात्र तसे होताना दिसून येत नाही. आज पुन्हा पेट्रोल तीन रुपयांनी महागले आणखी पुढील किती दिवसात कशा पद्धतीने महागाई होणार आहे हे रत्नागिरी वासियांना कळले पाहिजे. तरच जनता निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवेल!.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा