ठळक बातमीपत्र

  • 3 मेरोजी झालेली नीट युजी परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या कथित संशयावरून रद्द, एनटीए कडून सलग तिसऱ्या वर्षी परीक्षेत गोंधळ, देशभरातील २३ लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला.
  • इचलकरंजीत झालेल्या घरफोडी प्रकरणी सराईत गुन्हेगारासह तिघांना अटक, साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत.
  • आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स १ हजार ४५६ आणि निफ्टी ४३६ अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचं ११ लाख कोटी रुपयांचं नुकसान.
  • ई-चलन दंड माफीसाठी कोल्हापुरात परिवहन कार्यालयासमोर सलग दुसऱ्या दिवशी उपोषण सुरू, वाहनांवर स्टिकर लावून आंदोलकांकडून जनजागृती.

  • मजुरीवाढीसाठी इचलकरंजीतल्या खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचा प्रांत कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा.
  • अकरावीला ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील सर्व्हर डाऊनची समस्या दूर, दोन दिवसात २० हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी.
  • १८ मे रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वृक्ष प्राधिकरण समितीची नियुक्ती, बहुमजली पार्किंगमध्ये केबीनधारकांचं स्थलांतर आणि अग्निशमन दलातील फायरमनना कायम करण्याबाबत होणार निर्णय.
  • सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापुरात निघाली हिंदू एकता दिंडी.

  • राज्यस्तरीय आरोग्य मानांकनात कोल्हापूर महापालिकेला प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा, वैद्यकीय अधिकाऱ्यांना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांची सूचना.
  • जागतिक परिचारिका दिन विविध उपक्रमांनी संपन्न, सीपीआरसह ठिकठिकाणी विविध कार्यक्रम पडले पार.
  • आम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीगच्यावतीनं कळंबा इथल्या कॅसल स्पोर्ट्स टर्फवर क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ.
  • कोल्हापूर महानगरपालिकेच्या सेवा नागरिकांना जलद आणि पारदर्शकपणे उपलब्ध होण्यासाठी चार विभागीय कार्यालयांना आयुक्तांनी दिले प्रशासकीय आणि वित्त अधिकार.
  • आपले सरकार पोर्टल आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडं ऑनलाईन प्रस्ताव सादर केलेल्या पण तांत्रिक अडचणीमुळं प्रलंबित राहिलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडा ग्रेस गुण, राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय.
  • कोल्हापूर जिल्हा परिषदेनं राबवलेल्या मिशन उत्कर्ष अभियानाला मोठं यश, अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून आनंदोत्सव.
  • रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी कोल्हापूरचे सुपुत्र एम.बी.शेख यांची निवड झाल्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रासह विविध संस्था संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव.
  • उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीमवर ३-१ गोलनं एकतर्फी विजय मिळवत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश.


टिप्पण्या