मुख्य सामग्रीवर वगळा
आजच्या घडामोडी
पावसाचा इशारा: राज्यावर अकाळी पावसाचे सावट असून कोल्हापूरसह १५ जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.इचलकरंजी चोरी: इचलकरंजी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून एकाच रात्रीत ६ ठिकाणी चोरी झाली आहे. यात साडेपाच किलो चांदीच्या दागिन्यांसह साडेसात लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला.प्रकल्प पाहणी: कोल्हापूर शहरातील बंद प्रकल्पांना गती देण्यासाठी महापौर रूपाली निंबाळकर आणि आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी पाहणी केली. हे प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा आयुक्तांचा निर्धार आहे.महामंडळ नियुक्त्या: राज्यातील महामंडळांवरील नियुक्त्या दीड वर्षांपासून रखडल्या आहेत. महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमधील कार्यकर्त्यांना अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न विचारला जात आहे.फुटबॉल स्पर्धा: महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने पुणे संघावर ५-० ने एकतर्फी विजय मिळवला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना चषक देऊन गौरवण्यात आले.उपोषण: जिल्ह्यातील सर्व पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त करावेत, या मागणीसाठी चौथ्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.महामार्ग पूल काम: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कागल आणि पंचगंगा नदीवर पूल उभारण्याचे काम दिल्लीतील धारिवाल ग्रुपच्या भारत कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. माती परीक्षणाचे काम सुरू असून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.शोभायात्रा: संसार त्याग करून दीक्षा घेण्यासाठी निघालेल्या मनोजकुमार तातेड यांच्या स्वागतार्थ कोल्हापुरात भव्य शोभायात्रा पार पडली. यात जैन मारवाडी समाजातील श्रावक-श्राविकांचा सहभाग होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा