मुख्य सामग्रीवर वगळा
आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या
पेट्रोल-डिझेल दरवाढ: अवघ्या चार दिवसात पेट्रोल-डिझेलची दुसऱ्यांदा दरवाढ झाली असून कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०८ रुपये, तर डिझेल ९५ रुपयांवर पोहोचले आहे.अनधिकृत बांधकाम कारवाई: गांधीनगर ते तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला स्थगिती देण्यास कोल्हापूर सर्किट बेंचचा नकार. पुढील सुनावणी ९ जूनला होणार.परीख पूल रस्ता: कोल्हापुरातील शाहूपुरी आणि राजारामपुरीला जोडणाऱ्या परीख पुलाचा रस्ता गेल्या ७ महिन्यांपासून बंद आहे. जून महिन्यात हा पूल सुरू होण्याची शक्यता आहे.दुर्दैवी घटना: पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या दोन भावांपैकी १४ वर्षांच्या मुलाचा राजाराम बंधाऱ्यात बुडून मृत्यू. आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने मुलाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.हवामान: महाराष्ट्र तापलेला असतानाच ऐन उन्हाळ्यात पन्हाळगडावर धुक्याची चादर पसरली असून, पारा चक्क १० अंशांवर आला आहे.परिवहन मंत्री बैठक: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापूरच्या वाहतूकदारांसोबत ई-चलनबाबत बैठक झाली. वाहतूकदारांच्या मागण्यांना न्याय देऊ, असे आश्वासन नामदार सरनाईक यांनी दिले.गोकुळ सुनावणी: गोकुळ प्रशासक विरोधातील सुनावणी १० जूनपर्यंत लांबणीवर पडली आहे. मुदतवाढ मिळवण्याचे संचालक मंडळाचे प्रयत्न असफल ठरले आहेत.महापालिका निर्देश: संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांचा मुलगा चंद्रसेन चव्हाणचा रंकाळा तलाव परिसरातील कमानीत धुडगूस, सचिन चव्हाण आणि पुत्राची पोलिसांना दादागिरी, जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद.चोरट्यांनी भरदिवसा उकरला रस्ता, बीएसएनएलची ५ लाखांची भूमीगत केबल चोरीला, चोरीच्या नव्या फंड्यामुळे नागरिक आणि पोलीसही चक्रावले.कोल्हापूर महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये सोलर यंत्रणा बसवणार, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची माहिती.कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची झाली महापालिका चौकात निदर्शनं.नीट पेपर फुटी प्रकरणात अडकलेल्या शिवराज मोटेगावकरला अटक होताच शिवसेना ठाकरे गट आक्रमक, कोल्हापुरातील आरसीसी अकॅडमीवर युवा सेनेच्यावतीने हल्लाबोल.शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार भव्य मोर्चा.नेपाळमधील अकराव्या ज्युनियर आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारताचा दुसरा क्रमांक, पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंची बाजी.तीन महिन्यांची रखडलेली पेन्शन मिळावी या मागणीसह अन्य विषयांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा