मुख्य सामग्रीवर वगळा
आजच्या घडामोडी
वृक्ष प्राधिकरण आणि जैवविविधता समिती नियुक्ती करण्याच्या प्रस्तावासह विविध करवाढीचे विषय कोल्हापूर महापालिकेच्या सभेत उपसूचनेसह मंजूर, बहुमजली पार्किंग इमारतीमध्ये केबिनधारकांच्या स्थलांतराचा प्रस्तावही मंजूर.१३ गावांना पाणी पुरवठा करणारी गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजना रखडत ठेवणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा, आमदार अमल महाडिक यांची जिल्हा प्रशासनाला सूचना.नामदार हसन मुश्रीफ मुक्त गोकुळ दूध संघ हीच भूमिका कायम, आमदार शिवाजी पाटील यांचा हल्लाबोल, प्रशासक मंडळाकडून घेतली गोकुळची माहिती.मुश्रीफ मुक्त गोकुळ संघ सभासद करणार की? आमदार शिवाजी पाटील, नामदार मुश्रीफ यांचा खोचक सवाल.प्रेस क्लबच्या कार्यक्रमात नेत्यांची फटकेबाजी, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा झाला सन्मान, पत्रकारांच्या घरकुलाचा आणि पत्रकार भवन उभारणीचा विषय पुन्हा चर्चेत.आवक वाढल्यानं आंब्याच्या दरात घसरण, हंगामाच्या अंतिम टप्प्यात फळांचा राजा आला सर्वसामान्यांच्या आवाक्यात.महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रद्द करा, महाराष्ट्र मंदिर महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.हौसेला मोल नाही, जावयासाठी बनवलं चक्क सव्वा चार लाख रुपये किमतीचं चांदीचं कोल्हापुरी चप्पल.
रंकाळ्यावरील वाहनांच्या गर्दीवर उपाय, शालिनी पॅलेस समोरच्या खासगी जागेत पार्किंगची सुविधा.शक्तीपीठ महामार्गाला शिवसेना ठाकरे गटाचा ठाम विरोध, महामार्ग रद्द झाला नाही तर पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा.कोल्हापुरातील १०० कोटी रुपयांच्या निधीतील रस्त्यांची कामं अपूर्ण का, आम आदमी पक्षाचा सवाल.रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या बुंध्यांमध्ये असलेलं डांबर आणि काँक्रीट काढून वृक्षप्रेमी संस्थेनं झाडाचा कोंडलेला श्वास केला मोकळा.श्री सिद्धगिरी हॉस्पिटलचा १६ वा वर्धापनदिन उत्साहात, रुग्णसेवेतील कार्य अनमोल, एसबीआय उप महाप्रबंधक हरिश कुमार राजपाल यांचे गौरवोग्गार.गोकुळ दूध संघावर यापूर्वी ज्यांची सत्ता होती, त्यांच्याही कारभाराची चौकशी झाली पाहिजे, आमदार अमल महाडिक यांची स्पष्ट भूमिका.कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी महापालिकेत आला स्थगिती प्रस्ताव, पाच मिनिटांसाठी सर्वसाधारण सभा तहकूब.कोल्हापूरच्या हद्दवाढीला कोणत्या नेत्यांनी विरोध केला याची माहिती जाहीर व्हावी, नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांची मागणी.पथदिवे बसवण्यासह देखभाल दुरुस्तीचा ई ई एस एल कंपनीचा करार रद्द, बीएससी इन्फ्राटेक आणि विन्सो ग्लोबल कंपनीबरोबर करार करण्याच्या विषयावर गुरुवारी होणार विशेष सभा.तावडे हॉटेल परिसरातील बांधकामाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून कारवाई करू, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची ग्वाही.कोल्हापूर महापालिकेच्या सभेला बहुतांश सदस्य आले इलेक्ट्रिकल वाहनातून, महापौरांच्या आवाहनाला मिळाला चांगला प्रतिसाद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा