रत्नागिरीत एल इ डी मासेमाईला ऊत, प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची जनतेची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा एल इ डी द्वारे मासेमारीला ऊत आला आहे का असा सवाल सध्या उपस्थीत केला जात आहे. कारण समुद्रात १२ नोटीकलच्या आतमध्ये लाईट उजळलेले दिसून येत आहेत. त्यामुळे सहाय्यक मत्स्य आयुक्त मत्स्य व्यवसाय विभागाचे पूर्ण लक्ष या अवैध मासेमारीवर आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रत्नागिरीतील मिरकरवाडा, भगवती बंदर आणि भाट्ये परिसरात खोल समुद्रात एल इ डी द्वारे अवैधरित्या पर्ससीन नेट पद्धतीने मासेमारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे भाजप शिवसेना महायुती सरकार मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी सकारात्मक पावले टाकत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील खोल खाडी पात्रात एल इ डी द्वारे मासेमारी कशी काय होते असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. रत्नागिरी तालुका पर्सिन नेट मच्छीमार संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व एलईडी मासेमारी नौकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली असताना देखील रत्नागिरी शहरातील मिरकर वाडा भगवती बंदर भाटे परिसरामध्ये रात्रीच्या वेळी खोल समुद्रात लाईट पेटताना कसे काय दिसतात? यामुळे साशंकता व्यक्त केली जात आहे.

मत्स्य विभागाच्या वतीने अशा प्रकारे अवैध पद्धतीने एलईडी लाईट लावून मासेमारी होत असेल तर त्या नौकांवर कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जनतेमधून करण्यात येत आहे. कारण अवैध पद्धतीने मासेमारी होत असेल तर त्यामुळे शासनाचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कस्टम विभागाने देखील अवैध पद्धतीने मासेमारी करणारे नौकांवर कारवाई केली होती. अशाच पद्धतीने यावर्षी देखील कस्टम विभागाने जातीनिशी लक्ष घालून अवैध पद्धतीने एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेमधून करण्यात येत आहे. 

टिप्पण्या