मुख्य सामग्रीवर वगळा
आजची बातमी पत्र
- श्री अंबाबाई मंदिरात अधिक मासानिमित्त सुरू असणाऱ्या तीन दिवसीय धार्मिक अनुष्ठानाची देवीच्या अवभृत स्नानानं सांगता, नदीच्या पाण्याचा अंदाज आला नसल्यानं गटांगळ्या खाणाऱ्या चार ते पाच पुजाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन पथकानं वाचवलं
- हातकणंगले तालुक्यातील नागाव इथं विजेचा धक्का लागून अडीच वर्षाच्या परप्रांतीय चिमुकलीचा मृत्यू, घटनेनं परिसरात हळहळ
- गेल्या २ दिवसात तब्बल पावणेपाच लाख भाविकांनी घेतलं श्री अंबाबाई देवीचं दर्शन, सलग सुट्टी, शाळांच्या निकालानंतर भाविक-पर्यटकांच्या सहकुटुंब गर्दीनं कोल्हापूर फुललं
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात हातकणंगले तालुक्यातील मौजे तासगावचा तालुक्यात प्रथम क्रमांक
- अधिक मासामुळे चांदीच्या जोडव्यांना मागणी, जोडवी स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरीचा चांदी व्यवसाय तेजीत
- पोहण्यासाठी विहिरीत सूर मारणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ गावावर शोककळा
- १९ वर्षीय अपंग आणि गतीमंद तरुणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघड, हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या घटनेतील संशयित परप्रांतीय मुख्तार सिद्धीकी फरार
- करवीर पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणाला वेगळं वळण, पतसंस्थेच्या माजी अध्यक्षाच्या मुलानं साक्षीदाराला दिली धमकी
- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची सीपीआरला भेट, नूतनीकरणाच्या कामाची केली पाहणी.
- कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत १५ टन कचऱ्याचा झाला उठाव.
- बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाने राजारामपुरी पोलिसांना परवानगी दिली. गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा काँग्रेस प्रशांत आंबी यांचा इशारा.
- स्वर्गीय आशा भोसले यांच्या स्मृतींना उजाळा; भाजपच्या सांस्कृतिक विभागातर्फे 'स्वर आशा' संगीत मैफिल उत्साहात संपन्न.
- आदमापुरातील संत बाळूमामा मंदिर परिसरात पावसाचे पाणी साचल्याने भाविक आणि व्यापाऱ्यांची तारांबळ.
- कोल्हापूरची जीवनवाहिनी असणाऱ्या पंचगंगा नदीचा २५ मे रोजी प्रकट दिन; नदी घाटावर विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
- इचलकरंजीत खर्चिवालल्या यंत्रमागधारकांच्या आंदोलनादरम्यान दगडफेक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यासाठी यंत्रमागधारकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या.
- ज्येष्ठ वादक अनिल गोडे यांच्या अकॉर्डियनमधून निघालेल्या सुरावटींनी रसिक दंग; मैफिलीतून जमा झालेला १० हजार रुपयांचा निधी 'प्रतिज्ञा' संस्थेकडून एड्सग्रस्तांच्या संस्थेला प्रदान.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा