मुख्य सामग्रीवर वगळा
दिनविशेष आजचे
- कोल्हापूर सीमा विस्तार: ग्रामीण भागातून एकमताने प्रस्ताव आल्यास शासन सकारात्मक निर्णय घेईल - डॉ. के. एच. गोविंदराज.
- प्रदूषण नियंत्रण: शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि ड्रेनेजची कामे प्रगतीपथावर.
- भरती प्रक्रिया: महानगरपालिकेतील रिक्त जागा भरण्यासाठी जूनमध्ये सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी मिळणार.
- अपघात: शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुराजवळ ट्रक आणि बुलेटचा भीषण अपघात; एक ठार, तर दोन जण गंभीर जखमी.
- क्रीडा संकुल: छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाच्या १५५ कोटींच्या आराखड्याची जिल्हाधिकारी आणि आमदारांकडून पाहणी.
- चित्रपट महामंडळ: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांच्यासह १३ उमेदवारांची माघार.
- गुन्हेगारी: इचलकरंजी आयपीएल बेटिंग प्रकरणात नगरसेवकासह तिघांना अटक; ३० मे पर्यंत पोलीस कोठडी.
- आंदोलन: जलजीवन मिशन अंतर्गत कोवाडमधील पाणीपुरवठा योजनेवरून ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.
- अभिवादन: थोर क्रांतीकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा.
- चिंगारी कराओके ग्रुपच्यावतीने स्वर्गीय किशोर कुमार यांच्या १०५ गाण्यांचे गोविंदराव टेंबे नाट्यगृहात सादरीकरण, ग्लोबल जीनियस रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमी नोंद.
- कोल्हापूर जिल्ह्यात खरीप हंगामात यावर्षी कृषि विभागाने १ लाख ८७ हजार हेक्टरवर पेरणीचे ठेवले उद्दिष्ट.
- नेपाळमध्ये झालेल्या इंटरनॅशनल युथ तायक्वांदो स्पर्धेत कोल्हापूरच्या बीएमए सेल्फ डिफेन्स अकॅडमीच्या खेळाडूंचे यश.
- आयुर्मान संपलेल्या २८ वाहनांसह कार्यशाळेतील निरुपयोगी साहित्य भंगारात घालणार, कोल्हापूर महापालिकेला दोन कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित.
- छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी होणार साजरा.
- महावितरणच्या काळम्मावाडी सब स्टेशनमधील दुरुस्ती कामामुळे १ आणि २ जून रोजी कोल्हापूर शहरात होणार कमी दाबाने पाणी पुरवठा.
- कलानगरी कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवले चित्रपट, विविध कलाकार आणि तंत्रज्ञांचा महाराष्ट्र कलारत्न पुरस्काराने झाला सन्मान.
- दत्तक प्रक्रिया, कौटुंबिक कलह यावर मोफत मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापुरात हितेशी कौन्सलिंग सेंटर होणार सुरु, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणखी एक लोकहिताचा उपक्रम.
- राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने पटकावले उपविजेतेपद.
- गांजा विक्रीसाठी आलेल्या अमीरहमजा नदाफला अटक, पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची जरगनगर परिसरात कारवाई.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा