आजच्या दिवसातील घडामोडी

  • अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण, प्रवेशासाठी एकूण ७० हजार जागा उपलब्ध, पहिल्या फेरीत प्रवेश अर्ज आले केवळ ३२ हजार, यंदाही अकरावीच्या ३० टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता.
  • मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या उष्णतेच्या तीव्र लाटेला सुरुवात, २५ मे ते २ जूनपर्यंत जाणवणार नवतपाचा प्रभाव, नवतपाचे ९ दिवस संपल्यानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होणार असल्यानं पावसाची आस.
  • उतारावर थांबवलेला गॅसचा टँकर रस्त्याकडच्या चरीत कलंडल्यानं २३ वर्षीय चालकाचा ट्रक खाली चिरडून मृत्यू, आंब्यातील अपघातानंतर टँकरमधील गॅस मोकळा करण्यासाठी बुधवारी रात्री १० नंतर कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग राहणार ३ तासांसाठी बंद.
  • रंकाळ्याजवळच्या संध्यामठ ते राजकपूर पुतळा मार्गावर महापालिकेनं राबवली अतिक्रमण निर्मूलन मोहीम, काढलेली अतिक्रमणं पुन्हा निर्माण होणार नाहीत याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घेण्याची गरज.
  • इचलकरंजी महापालिका प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे हजारो लिटर पाणी थेट गटारीत, मुख्य रस्ता जलमय.
  • अपात्र व्यक्तींची नाव मतदार यादीत राहू नये आणि पात्र व्यक्तींची नाव मतदार यादीत समाविष्ट झालंच पाहिजे यासाठी बीएलओ आणि यंत्रणेनं चोख काम करावं, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्या सूचना.
  • सोळांकूरातील ते हल्लेखोर वानर जंगलाच्या दिशेनं गायब, ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास.
  • इचलकरंजीत साजरा झाला चक्क खड्ड्याचा वाढदिवस, 
  • गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याच्या मागणीसाठी जमियत उलमा संघटनेच्यावतीनं दसरा चौकात निदर्शनं
  • रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांसाठी आदर्शवत ठरावा, संभाजीराजे छत्रपती
  • एकोंडी इथल्या अक्षय ढेरेची व्हिएतनाममध्ये झालेल्या स्पर्धेत सुवर्ण भरारी, अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील मल्हाने आशियाई स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक
  • तीन महिन्यांचा पुरेसा धान्यसाठा शासनाकडून उपलब्ध नसतानाही तो ३१ मे पर्यंत वाटप करायचा कसा, जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदारांचा सवाल
  • ५३ वर्षांपासूनचं इचलकरंजीतील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्यानं केलं जमीनदोस्त, अतिक्रमण काढताना महिलांकडून तीव्र विरोध
  • नृसिंहवाडी दत्त मंदिरात झालं विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण, तर अधिक मासाचं औचित्य साधून आणि कमला एकादशीनिमित्त कोल्हापुरातील राधाकृष्ण मंदिरातही झालं विष्णू सहस्र नामाचं सामुदायिक पठण
  • कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबच्यावतीनं झाली नाटक आणि अभिनय कार्यशाळा
  • अखेर अडीच महिन्यांनंतर कोल्हापुरातील परिख पुलाखालची वाहतूक सुरू, शाहूपुरी गोकुळ हॉटेल आणि टेंबलाई उड्डाण पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा
  • अतिप्रसंगास विरोध केल्यानं छबुताई पाटील यांचा खून केल्याची कोलोलीतील अंकुश पाटील याची कबुली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून खुनाचा उलगडा
  • तरुणावर हल्ला करून रोकड-मोबाईल आणि दुचाकी चोरल्याप्रकरणी चौघांपैकी पियुष पवार आणि किरण वराळे या दोघा चोरट्यांना शाहूपुरी पोलिसांकडून अटक
  •  

टिप्पण्या