मुख्य सामग्रीवर वगळा
आजच्या ठळक घडामोडी
दहा दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर ८७ पैशांची वाढ, तर डिझेल ९१ पैशांनी महागलं, कोल्हापुरात पेट्रोलचा दर पोचला १०९ रुपयांवर.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एनडीएमधील विलिनीकरणाचा कोणताही मुद्दा नाही, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची माहिती.श्री अंबाबाई मंदिरातील शिलालेख, मूर्ती लेख, विरगळ यांचा अभ्यास केंद्रीय पुरातत्व विभागाच्या चेन्नई कार्यालयाकडून होणार, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून मंदिर परिसराची पाहणी.आनंदवार्ता... मान्सून महाराष्ट्रात १० जूनला पोचणार, तर पुढील आठवडाभर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज.राजर्षि शाहूंनी सुरू केलेली कुस्तीची परंपरा आणि कोल्हापूरच्या मल्लांनी मिळवलेल्या उत्तुंग यशाचा आढावा घेणारं बी न्यूजचं विशेष वृत्त... जागतिक कुस्ती दिनानिमित्त...वृक्षतोडणी ठेकेदार आणि उद्यान अधीक्षकाच्या मिलीभगतमुळे कामाकडं दुर्लक्ष, मलाईला प्राधान्य, महापालिका स्थायी समिती सभेत आदिल फरास यांचा आरोप.चंदगड तालुक्यातील केरवडे परिसरात बिबट्याचा वावर, वन विभागाचा सतर्कतेचा इशारा.शिवसेना शिंदे गटाचा मेळावा कोल्हापुरात संपन्न, मतदार यादी पुनर्निरिक्षण मोहिमेवर चर्चा.अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत तीन दिवसांनी वाढवली, २५ मे पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचं शिक्षण संचालक प्रभावती कोळेकर यांचं आवाहन.बारावीची गुणपत्रिका कनिष्ठ महाविद्यालयात २५ मे पासून मिळणार.अस्ताव्यस्त पार्किंग आणि वाढत्या अतिक्रमणांवर महापालिका प्रशासन आणि पोलीस दलाकडून अंकुश गरजेचा, अन्यथा कोल्हापूरची वाहतूक कोंडी वाढून पर्यटक पाठ फिरवण्याची भीती.तावडे हॉटेल गांधीनगर परिसरातील महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामं नियमितीकरणाचा डाव यशस्वी होऊन देणार नाही, कॉमन मॅन संघटनेची मागणी.इंधन दरवाढ आणि नीट पेपरफुटी विरोधात काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदोलन, काही पेट्रोल पंपांवर झाली निदर्शनं.इंडियन प्रीमियर लीगच्या प्रमोशनसाठी २४ एप्रिल रोजी कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर फॅन पार्कचं आयोजन.आपत्तीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज, अग्निशमन विभागाची पंचगंगा घाटावर झाली प्रात्यक्षिकं.खाजगी, विनाअनुदानित आणि अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या कामासाठी सक्ती करू नये, मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश.१३ टन आंब्यांचं मोफत वाटप, हुपरीत मानवतेचा गोडवा, लोणचे कंपनीनं नाकारलेले आंबे चालकानं गोरगरिबांना वाटले, शेतकरी आणि चालकाच्या उदार भूमिकेचं कौतुक.आंतरराष्ट्रीय टॅलेंट सर्च परीक्षेत चंबुखडी इथल्या भारत भूषण विद्यालयातील शिवन्या कापूसकर जिल्ह्यात प्रथम.पन्हाळा तालुक्यातील वाघवे इथं ओढ्यात मृतावस्थेत नवजात अर्भक आढळल्यानं परिसरात खळबळ.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा