आजच्या ठळक घडामोडी

  • कौशल्यावर आधारित नव्या शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा, सामाजिक बांधिलकी आणि नीती मूल्यांचे पालन व्हावे, नूतन कुलगुरू डॉक्टर आर. के. कामत यांची भूमिका.
  • अंमली पदार्थ तस्करी आणि सायबर गुन्हेगारी मुळापासून मोडून काढणार, कोल्हापूर परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला निर्धार.
  • चंदगड तालुक्यात वृक्षारोपण घोटाळा, १ कोटी ३४ लाख रुपये खर्चून लावलेली झाडे वर्षभरातच वाळली, वृक्षारोपणाच्या ठेकेदाराकडून रक्कम वसूल करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी.
  • प्रक्रिया केलेले सांडपाणी एमआयडीसी आणि कोरडवाहू शेतीला देण्याचा प्रस्ताव, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत झाली बैठक.
  • एलईडी पथदिवे बसवण्यासाठी ठेकेदार कंपनी नेमण्यावरून नगरसेवक आक्रमक, पण टक्केवारी आणि ढपला संस्कृती गाडण्यासाठी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक, अन्यथा संशयकल्लोळ वाढण्याची भीती.
  • गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत गोकुळच्या दूध संकलनात यंदा ९६ हजार ३४९ लिटरची वाढ.
  • अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्व्हर डाऊनची डोकेदुखी कायम, आजअखेर जिल्ह्यातील केवळ २ हजार विद्यार्थ्यांची झाली ऑनलाइन प्रवेश नोंदणी.
  • एलएलपी कंपन्या स्थापन करून जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांची तब्बल २२३ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक, कोल्हापूर पोलिसांकडून १५५ संशयितांना अटक, केवळ २ कोटी ८ लाखांची मालमत्ता जप्त.
  • इचलकरंजीतील यंत्रमाग कारखान्याच्या शेडमधून ३ लाख १८ हजार रुपयांचे कापड तागे लंपास.
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने ३१ मे रोजी कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन.
  • २४ मे रोजी कोल्हापुरातील दत्त समर्थ सांस्कृतिक भवन इथे श्री स्वामी समर्थ नामस्मरण महासोहळ्याचे आयोजन; अक्कलकोट देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचा होणार विशेष सन्मान.
  • कोल्हापूर शहरातील नालेसफाईची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचे निर्देश.
  • करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात अधिक मासानिमित्त तीन दिवसीय धार्मिक अनुष्ठानाला प्रारंभ.
  • सायबर फ्रॉडमधील रक्कम मुरवण्यासाठी आमिष दाखवून वेगवेगळी अकाऊंट काढण्यास भाग पाडणाऱ्या चौघांना सायबर पोलिसांकडून अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी.
  • रोजगार हमी योजनेच्या प्रश्नावरून दन्यचे वडगाव ग्रामस्थांचा करवीर पंचायत समितीवर आक्रोश मोर्चा; कार्यालयाला टाळे ठोकून ग्रामस्थांनी व्यक्त केला तीव्र संताप.
  • इचलकरंजी महापालिकेतील नेत्यांच्या प्रतिमा काढल्याने शिंदे शिवसेनेचा महापालिकेवर मोर्चा; काही कालावधीनंतर पुन्हा लागले नेत्यांचे फोटो.
  • रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्यावतीने २३ आणि २४ मे रोजी शॉपिंग आणि फूड एक्सपोचे आयोजन.
  • तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टी नाल्यावरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी ५ जूनपर्यंत भूसंपादन करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा कृती समितीचा इशारा.
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी एकूण ६० अर्ज दाखल.
  • टिप्पण्या