मुख्य सामग्रीवर वगळा
आजच्या घडामोडी
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज मधील विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी धनगर समाजाचा मूक मोर्चा, संशयितांना तात्काळ अटक करण्याची मागणी.राजारामपुरी परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांची पोलिसांनी काढली धिंड, ८ गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी.परिचारिका संवर्गातील प्रशासकीय बदली प्रक्रियेविरोधात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्यावतीने सीपीआरसमोर झाली निदर्शने.बीव्हीजी कंपनीकडून १०८ रुग्णवाहिकेवरील चालकांना आरोग्य विमा मिळावा, या मागणीसाठी रुग्णवाहिका चालक युनियनच्यावतीने काम बंद आंदोलन, जिल्ह्यातील ३६ रुग्णवाहिका बंद झाल्याने रुग्णांचे हाल.यावर्षीचा भाई माधवराव बागल पुरस्कार महाराष्ट्र दिनमानचे मुख्य संपादक आणि ज्येष्ठ राजकीय समीक्षक विजय चोरमारे यांना जाहीर, गुरुवार २८ मे रोजी होणार पुरस्कार वितरण.जमादार चौक नामबदलाच्या मागणीवरून मुरगुडमध्ये तणाव, शुक्रवारी मुरगुड बंदची हाक.कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील गट क्रमांक १३५४ वरील जमिनीवर असलेली अतिक्रमणे कायम करून प्रॉपर्टी कार्ड द्यावीत, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने.कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीशेजारील कालव्यात उडी मारून २५ वर्षीय परप्रांतीय तरुणाची आत्महत्या.व्यापाऱ्याला दागिने देण्यासाठी निघालेल्या कारागिराला संमोहित करून दोघांनी ३० तोळे दागिने केले लंपास, सायंकाळी सातच्या सुमारास भाऊसिंगजी रोडवरील घटनेने खळबळ.कोल्हापूर शहरातील एलईडी पथदिवे बसवण्याचा ठेका दिलेल्या ईईएसएल कंपनीचा करार रद्द, समाधानकारक काम नसल्याने कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा ठराव विशेष महासभेत मंजूरमहापालिकेच्या जीएसटी परताव्यातील ३ कोटी १० लाख रुपये शासनाने परस्पर दिले ईईएसएल कंपनीला, शासनाने नेमून दिलेल्या बीएससी इन्फ्राटेक आणि विन्सोग्लोबल या कंपनीला ठेका देण्याबाबत घाई नको, महासभेत मागणीभाचीला पोहायला घेऊन गेलेल्या मामावर काळाचा घाला, करवीर तालुक्यातील वाकरे इथल्या ४२ वर्षांच्या रमेश मारुती बुरुड यांचा पाण्यात बुडून मृत्यूकाळम्मावाडीतील धोकादायक डोहात कोल्हापुरातील तरुणाचा बुडून मृत्यू, धोकादायक पाण्याचे फलक लावूनही पर्यटकांचे दुर्लक्ष, अनेक दुर्घटना घडूनही लोकांची बेफिकीरीजयसिंगपुरात भरदिवसा तरुणाचा निर्घूण खून, शहरात खळबळ, खुनाचे कारण अस्पष्टशिवाजी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूपदी डॉ. रजनीश कामत यांची नियुक्ती, मुंबईच्या होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले डॉ. कामत होणार शिवाजी विद्यापीठाचे १४ वे कुलगुरू
घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन परप्रांतीय चोरट्यांना सांगोला परिसरातून अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून चोरट्यांकडील २० तोळ्यांचे ३३ लाखांचे दागिने जप्तइचलकरंजीत मजुरीवर काम करणाऱ्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीचे आंदोलन हिंसक वळणावर, ६० ते ७० यंत्रमागावरील बीम कापली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा