रत्नागिरी जांभारी गावात गावठी बॉम्ब सदृश वस्तूच्या स्फोटामुळे महिलेच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत!
रत्नागिरी तालुक्यातील जांभारी या गावामध्ये जंगली प्राणी मारायचा बॉम्बचा स्फोट झाल्याने एका महिलेच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाल्याची घटना आज मंगळवारी घडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महिलेला दुखापत झाल्यानंतर त्या महिलेला तात्काळ रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता या महिलेला पुढील उपचारासाठी मुंबईकडे नेण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
त्या महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती महिला व तिचे पती कोंड्याच्या काठ्या तोडण्यासाठी जांभारी फाटा इथे गेले होते. तोडलेल्या काठ्या उचलताना त्या ठिकाणी स्फोट झाला आणि त्या महिलेच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. यावेळी तिथे काही ग्रामस्थ जमले असता सदर बॉम्ब जंगली प्राणी मारण्यासाठी बनवून त्या ठिकाणी ठेवला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरीत एकच खळबळ उडाली आहे. कारण यामुळे त्या महिलेच्या हाताची बोटे तुटल्याचे बोलले जात आहे.
अशा प्रकारची स्फोटके ठेवण्यासाठी कुणाची परवानगी आहे आणि त्या भागातील पोलिसांना याबाबत काहीच कशी माहिती नाही? आता पोलिस सदर बॉम्ब सदृश पदार्थ कुणी बनवले आणि त्याचा काय उद्देश होता याबाबत सखोल तपास करतील का आणि मूळ आरोपीला शोधून काढतील का असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा