मुख्य सामग्रीवर वगळा
दिवसभरातील घडामोडी
- सुवर्ण बाजार: केंद्र सरकारने चांदीच्या आयातीवर निर्बंध लादल्याने आणि बाजारात रोकड टंचाई व मंदावलेल्या मागणीमुळे सोन्या-चांदीचे भाव एमसीएक्सपेक्षा कमी झाले आहेत. यामुळे सराफा व्यवसायावर अस्थिरतेचे सावट आहे.
- कोल्हापूर स्थानिक: रंकाळा चौपाटी परिसरातील पार्किंग आणि अंधारामुळे रंकाळा टॉवर ते फुलेवाडी रस्ता धोकादायक बनला आहे.
- राजकीय/सामाजिक: आमदार अमल महाडिक यांनी ई-चलन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रदीप राठोड यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.
- धार्मिक: अधिक मासाला सुरुवात झाली असून, गेल्या दोन दिवसांत दीड लाख भाविकांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले आहे.
- क्रीडा: 'महापौर चषक' फुटबॉल स्पर्धेत वेताळमाळ संघाने विजेतेपद पटकावले, तर शिवाजी तरुण मंडळ उपविजेते ठरले.
- इचलकरंजी: शहरात पाणी टंचाई असतानाच जलवाहिनीला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
- प्रशासन: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक पद दीड महिन्यापासून रिक्त असल्याने समितीचे कामकाज विस्कळीत झाले आहे.
- आंदोलन: केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात कोल्हापुरात शिवसेना (ठाकरे गट) तर्फे उपहासात्मक आंदोलन करण्यात आले.
- दुर्दैवी घटना: न्यू शाहूपुरी येथील १९ वर्षीय तरुणाचा राजाराम तलावात बुडून मृत्यू झाला आहे.
- आर्ट ऑफ लिव्हिंगच्यावतीनं ध्यानधारणा आणि भक्ती संगीताचा कार्यक्रम संपन्न.
- कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीनं मोफत लसीकरण सेवा केंद्राचं उद्घाटन, ० ते १६ वयोगटातील बालकांना नियमित मिळणार सर्व प्रकारचे डोस.
- शेतकरी कर्जमाफीच्या धर्तीवर आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांतून घेतलेली कर्ज माफ करावीत, आरपीआय आठवले गटाची मागणी.
- अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्यावतीनं २० मे रोजीच्या एक दिवसीय देशव्यापी बंदमध्ये कोल्हापूरकरांचा शंभर टक्के सहभाग, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनचा निर्णय.
- इचलकरंजीजवळ खोतवाडीत पूर्ववैमनस्यातून नातेवाईकांच्या दोन गटात हाणामारी, गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या, ६ जणांवर गुन्हा.
- बालिंगा सबस्टेशन वीज वाहिनीच्या दुरुस्तीमुळं सोमवारी निम्या कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा होणार खंडित.
- सोलापूर इथं झालेल्या खुल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत जे जे रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी मिळवलं घवघवीत यश.
- आप्तकालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची माहिती, जिल्हाधिकाऱ्यांनी राजाराम बंधाऱ्यावर केली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची पाहणी.
- सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं काम कोल्हापूर महापालिकेनं सुरू केलं नसल्याच्या निषेधार्थ आयुक्त कार्यालयात सांडपाणी ओतण्याचा नागरी कृती समितीचा इशारा.
- कागलजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर मोकाट जनावरांचा उपद्रव, अपघातांचा धोका वाढला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा