रत्नागिरी पणन विभागाला दिलेले आंबा कुलिंग व्हॅन सुशोभीकरणासाठी आहे काय? मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, जनतेची मागणी

सिंधू रत्न समृद्ध योजना अंतर्गत रत्नागिरी पणन विभागाला देण्यात आलेली आंबा वाहतुकीसाठी कुलिंग व्हॅन ही सुशोभीकरणासाठी ठेवण्यात आली आहे काय असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. कुलिंग व्हॅन दिल्यापासून पणन विभागाने या गाडीचा फारसा उपयोग केला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे हा शासकीय निधीचा एक प्रकारे दुरुपयोगच म्हणावा लागेल त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारच्या योजनांची चौकशी करावी अशी मागणी जनतेमधून करण्यात येत आहे. 

सन 2022 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी च माध्यमातून सिंधू रत्न समृद्ध योजनेअंतर्गत रत्नागिरी पणन विभागाला आंबा वाहतुकीसाठी कुलिंग व्हॅन देण्यात आली होती. मात्र याचा उपयोग रत्नागिरीतल्या आंबा बागायतदारांना फार काही झालेला दिसून येत नाही. सध्याही कूलिंग व्हॅन रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये उभी आहे. खरंतर भाजप महायुती सरकारच्या अशा प्रकारच्या योजना खूप चांगल्या होत्या मात्र त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली नाही. या कुलिंग व्हॅनसाठी जवळपास वीस ते पंचवीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असावा. हा सर्व निधी शासकीय असतो. त्यामुळे ही कुलिंग व्हॅन लवकरात लवकर चालू होऊन आंबा बागायतदारांना त्याचा काही फायदा झाला तर खूप चांगले होईल अशा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.

टिप्पण्या