अँटी करप्शन ब्युरो कडून राजापुरात मागील दहा, पंधरा वर्षात मोठ्या कारवाया, मात्र अजूनही महसूल खात्याला शिस्त का लागत नाही? पुन्हा पुन्हा लाच स्वीकारणारे तलाठी, मंडळ अधिकारी राजापुरात कसे काय सापडतात? कालांतराने काही तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे प्रमोशन देखील झाले आहे?
मागील दहा वर्षांपासून राजापूर तालुक्यात महसूल विभागामध्ये अँटी करप्शन ब्युरोच्या सर्वाधिक कारवाया झाल्या आहेत. मात्र एवढ्या कारवाई हऊन देखील राजापूर महसूल प्रशासनावर जिल्हाधिकारी व महसूल मंत्री यांच्याकडून शिस्त का लावण्यात येत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. गुरुवार दिनांक 14 मे रोजी एंटी करप्शन ब्युरो ने पुन्हा एकदा तलाठी व मंडळ अधिकारी यांना पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. अँटी करप्शन ब्युरो कडून पकडण्यात आलेले तलाठी व मंडळ अधिकारी पुन्हा काही महिने उलटल्यानंतर पुन्हा यांना त्या कारणाने सेवेत रुजू झालेले देखील पाहण्यात आले आहेत. असे प्रकार राजापूर तालुक्यातील का घडत आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एकेकाळी जर राजापूरच्या तहसीलदारांनाच पैसे घेताना अँटी करप्शन ब्युरो ने रंगेहात पकडण्याची घटना घडली होती. त्यानंतर मागील दहा वर्षात काही तलाठी व मंडळ अधकाऱ्यांना सातबारा संबंधित असलेली कामे करण्याकरता पैशाची लाच स्वीकारताना अँटी करपन ब्युरो ने रंगेहात पकडून कारवाई केली आहे. मात्र त्यातील काही कारवाई झालेल्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना काही वर्षानंतर पुन्हा एकदा सेवेमध्ये रुजू झालेले पाहायला मिळाले आहे. अँटी करप्शन मध्ये कारवाई झालेली तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना काही कालांतरानंतर प्रमोशन देखील मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री पारदर्शक कारभाराच्या वल्गना करतात. मात्र असे असताना राजापूर तालुक्यात पुन्हा पुन्हा लाच स्वीकारण्याची परंपरा आहे की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी जनतेची कामे करण्याकरिता शासकीय शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त पैसे स्वीकारणे हे कितपत योग्य आहे. काही तलाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात मात्र अशा प्रकारे लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्यांच्यामुळे संपूर्ण महसूल प्रशासन हादरून जाते.
खरे तर तलाठी व मंडळ अधिकारी यांची हजेरी ऑनलाइन पद्धतीने थम्पिंग मशीन द्वारे किंवा फेस रिकग्निशन सिस्टम द्वारे हजेरी लागली पाहिजे. राजापूरच्या काही तलाठ्यांनी आपले दैनंदिन अहवालच प्रांताधिकारी कार्यालयाकडे सादर केले नसल्याचे देखील बोलले जात आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक तलाठी सजा व मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य केल्यास अशा प्रकारे लाच स्वीकारण्याची सवय कमी होईल व अशा प्रकारच्या घटना घडणारच नाही.
अनेक वेळेला काही तलाठ्यांच्या बाबतीमध्ये किंवा काही मंडळ अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये ते नेमके कुठल्या तारखेला कुठे जातात, त्यांच्याकडे हालचाल रजिस्टर असते का, तहसीलदार व प्रांताधिकारी महिन्यातून किती तलाठी सजा व मंडळ अधिकारी कार्यालयांना भेटी देतात, काही तलाठ्यांकडे दोन दोन चार चार गावांचे अतिरिक्त पदभार देण्यात आले आहेत अशा परिस्थितीमध्ये सदर तलाठी कोणत्या सजामध्ये बसले आहेत हे काही समजून येत नाही. कुठल्या तारखेला कुठले तलाठी सजा मध्ये बसणार आहेत याबाबत नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती नसते. शासकीय वेळेनुसार तलाठी व मंडळ अधिकारी सकाळी दहा वाजता हजर राहतात का हा देखील मोठा प्रश्न आहे.
त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या भाजप महायुती सरकारकडून राजापूर तालुक्याच्या महसूल खात्यामध्ये यापुढे एकही भ्रष्टाचाराच्या घटना किंवा लाच स्वीकारण्याच्या घटना घडणार नाहीत यासाठी ठोस पावले उपाययोजना करण्यात येणार का असा सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा