आजच्या विशेष महत्त्वाच्या बातम्या
आजच्या बातमीपत्रात पहा...
- सोने-चांदी झाली महाग: केंद्र सरकारने आयात शुल्क ६ टक्क्यांवरून वाढवलं १५ टक्क्यांपर्यंत. विदेशी मुद्रा साठा वाचवण्यासाठी आणि रुपयाला आधार देण्यासाठी मोठा निर्णय.
- इचलकरंजीचा पाणी प्रश्न: शिव शाहू विकास आघाडीकडून महापालिकेत 'मडकी फोड' आंदोलन. जोरदार घोषणाबाजीने काही काळ तणाव.
- माजी सैनिकाने रचला चोरीचा बनाव: कर्जबाजारी झाल्याने महेश पाटील या चंदगडच्या माजी सैनिकाने स्वतःच्याच घरात केली चोरी. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केला भांडाफोड.
- अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र: भू-संपादनासाठी १३९ मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण. विस्थापित होणाऱ्या घटकांचे मंदिर परिसरातच क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव.
- मत्स्य व्यवसायाला चालना: राधानगरीसह परिसरात राबवणार मत्स्य प्रकल्प. ५ हजार कुटुंबांना मिळणार रोजगार; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती.
- इचलकरंजी महापालिका सभा: सुळकूड पाणी योजनेसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा एकमताने निर्णय.
- कोल्हापूरकरांचे दातृत्व: पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीतून ६ लाख ४९ हजार रुपये जमा.
- ई-चलन विरोधात आंदोलन: कोल्हापूर आरटीओ समोर केबिनधारकांचा कडकडीत बंद. तिसऱ्या दिवशीही तोडगा नाही.
- नाला सफाईला वेग: कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून सफाई सुरू.
- रंकाळा तलावात बसवण्यात येणाऱ्या म्युझिकल फाउंटनचं काम कोल्हापूरच्या ऐतिहासिक प्रतिमेला साजेसंच करावं, आमदार राजेश क्षीरसागर यांची सूचना.
- विविध राजकीय घडामोडींचं केंद्र असणारं कोल्हापूरचं सर्किट हाऊस पडलंय ओस, नेत्यांच्या बैठका होतायत तारांकित हॉटेलमध्ये.
- कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता', या पुस्तकाचं ६ जून शिवराज्याभिषेक दिनी बिंदू चौकात सामूहिक वाचन; कोल्हापुरात झालेल्या कॉम्रेड पानसरे विचार संमेलनात ठराव.
- पारा ४० अंशांपर्यंत पोहोचल्यानं जिल्ह्यातील रहिवासी आणि जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम, प्रत्येकानं दक्षता घेण्याची गरज.
- कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमणं, पार्किंग व्यवस्था आणि सिग्नल यंत्रणा सुधारण्याबाबत महापालिका आणि शहर वाहतूक शाखेच्या बैठकीत चर्चा.
- 'शंभर दिवसीय क्षयमुक्त कोल्हापूर' या अभियानाला नागरिकांनी सहकार्य करून अभियान यशस्वी करावं, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन यांचं आवाहन.
- फेरीवाला समितीची निवडणूक होऊन २ वर्षांचा कालावधी लोटला तरी, राजपत्र प्रसिद्ध झालेलं नाही; महापालिकेवर मोर्चा काढण्याचा फेरीवाला संघटनेचा इशारा.
- विद्यार्थी वाहतूक बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक, १० जण जखमी, ४ गंभीर; औरवाड-कवठेगुलंद मार्गावर झाला अपघात.
- महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात दिलबहार तालीम संघाचा बलाढ्य खंडोबा तालीमवर टायब्रेकरमध्ये ३-१ गोलनं विजय, दिलबहार संघ उपांत्य फेरीत दाखल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा