आज चे बातमी पत्र

  • काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
  • ११ वीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली असून, १ जुलैपासून वर्ग सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय आहे.
  • मातृदिनानिमित्त कोल्हापुरात महिला भाविकांसाठी 'दूलू' स्वच्छतागृहाची भेट देण्यात आली आहे, अशी माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी दिली.
  • पंचगंगा नदीमध्ये जलपर्णीचे संकट वाढले असून नदीकाठच्या गावांचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच कोल्हापुरात नदी घाटावर मृत मासे तरंगताना आढळले आहेत.
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे कागल शहरात भव्य मिरवणुकीने आणि घोषणांनी उत्साहात स्वागत करण्यात आले.
  • १० वीच्या परीक्षेत राज्यातील सुमारे ९४ हजार विद्यार्थी मराठी विषयात नापास झाल्याने खळबळ उडाली आहे. मराठीच्या अस्तित्वासाठी उपाययोजनांची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
  • मजुरीवाढीच्या मागणीसाठी यंत्रमाग कारखाने बंद ठेवून आंदोलन करण्याचा खर्चीवाले यंत्रमागधारकांचा निर्धार.
    • शक्तीपीठ महामार्गाला विरोध: नव्या शक्तीपीठ मार्गामुळे करवीर तालुक्यातील १८ गावांतील ६०० ते ७०० एकर आणि राधानगरी तालुक्यातील २० गावांमधील ८०० एकर उसाची जमीन बाधित होणार आहे. या प्रकल्पाला आमदार चंद्रदीप नरके यांनी तीव्र विरोध दर्शवला असून तसे निवेदन उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे.
    • बँक भरतीसाठी ७०:३० फॉर्म्युला: जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील नोकर भरतीसाठी आता ७०:३० चा फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना ७० टक्के जागांवर रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
    • सुप्रिया सुळे यांची सांत्वनपर भेट: ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
    • जुना राजवाडा पोलिसांची कारवाई: एका मसाज पार्लर आणि लॉजवर पोलिसांनी छापा टाकून पीडितेची सुटका केली. या कारवाईत ३ मोबाईल आणि रोख रकमेसह ३८ हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून दोघांना अटक केली आहे.
    • थॅलेसेमिया चाचणीचे आवाहन: थॅलेसेमिया हा अनुवांशिक आजार असल्याने लग्नापूर्वी वधू-वरांनी याची तपासणी करणे ही काळाची गरज असल्याचे मत डॉ. वरुण बाफना यांनी व्यक्त केले आहे.
    • पुरस्कार प्रदान सोहळा: पी. साईनाथ यांना 'अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार' तर अभिजित करंडे यांना 'मोहन मस्कर स्मृती पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
    • गांजा जप्त: कळेजवळील मरळी गावात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत उसाच्या शेतातून २५ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी शेतकरी भिकाजी पाटील याला अटक करण्यात आली आहे.
    • जुगार अड्ड्यावर छापा: कबनूर येथे सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ८ जणांना अटक केली. यावेळी २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    • महापौर चषक फुटबॉल स्पर्धा: पाटाकडील तालीम संघाने प्रॅक्टिस क्लबवर २-१ अशा गोलफरकाने मात करत विजय मिळवला. या विजयासह पाटाकडील संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

टिप्पण्या