देवरुख मधील चोरपऱ्या ते जामा मशीद बाजारपेठ मधील मुख्य रस्त्याची नगराध्यक्ष मृणाल शेट्ये यांनी केली पाहणी

देवरुख मधील चोरपऱ्या ते जामा मशिद या बाजार पेठमधील मुख्य रस्त्याचे काम सुरू झाले असून ते चांगल्या प्रकारे व्हावे, उत्तम दर्जाचे व्हावे या उद्देशाने नगरध्यक्षा सौ मृणाल शेट्ये यांनी साईट व्हिजीट करत कामाची पहाणी केली. संबंधित ठेकेदार प्रतिनिधीना चांगल्या दर्जाचे काम करण्याबाबतच्या सूचना दिल्या. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये , सुशांत मुळे , नगर पंचायत अभियंता मानसी कांबळे, सुतेज यादव हे उपस्थित होते.

टिप्पण्या