आजच्या ठळक घडामोडी

  • पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शाहू स्टेडियमवर झाला महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन ध्वजारोहण सोहळा.
  • राज्याच्या विकासात कोल्हापूर जिल्ह्याला प्रगतीपथावर नेऊया, नामदार प्रकाश आबिटकर यांचे आवाहन.
  • फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, कोल्हापूर विभागाचा निकाल ८७.८० टक्के, मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक.
  • संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर प्रशासक नियुक्ती होणे ही नियमित शासकीय प्रक्रिया, गोकुळवरील प्रशासक नियुक्तीच्या मुद्द्याचे कोणीही राजकीय भांडवल करू नये, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भूमिका.
  • किरकोळ कारणातून परप्रांतीय तरुणाने केला सख्ख्या भावाचा खून, मलकापूरमधील घटनेनंतर पोलिसांनी केली धीरेंद्र इतवारी सिदारला अटक.
  • एस.टी. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या कामिना चौगुले या सराईत चोरट्या महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक, पावणे पाच लाखांचे दागिने जप्त.
  • इचलकरंजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांपेक्षा सत्ताधारीच आक्रमक, तब्बल ७ तास रंगली सभा.
  • ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रसेविका समितीच्या वतीने झाला सामूहिक घोष वादनाचा कार्यक्रम.
  • कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत ॲड. मंडलिक पॅनेलची बाजी, चिटणीस पॅनेलला मिळाल्या ७ जागा.
  • एलपीजी गॅस दराबाबत तोडगा निघाला नाही तर २ मे नंतर रिक्षा प्रवासी सेवा बंद करण्याचा रिक्षा संघटनांचा इशारा.
  • माजी खासदार किरीट सोमय्या यांची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याशी मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेसंबंधी चर्चा
  • कागल शहरात उभारला जातोय राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, ६ मे रोजी राजर्षींच्या पुतळ्याची शहरात निघणार भव्य मिरवणूक, नियोजन बैठकीत कार्यकर्त्यांची माहिती
  • आद्य शंकराचार्य यांच्या जयंती उत्सवाची पालखी आणि महाप्रसादाने सांगता
  • ७ मे रोजी हरियाणातील रोड मराठा समाजाचे प्रतिनिधी कोल्हापुरात येणार, त्यांचा कोल्हापूर दौरा संस्मरणीय करण्याचा विविध मराठा, बहुजन समाज संघटनांचा निर्णय
  • इचलकरंजीतील प्रोसेसचं प्रक्रिया केलेलं पाणी शेतीला देऊन पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न
  • पत्रकार समीर देशपांडे यांनी लिहिलेलं पुस्तक म्हणजे कोरोना काळातील उत्तम दस्तऐवज, 'कोरोनाशी भिडताना' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात जाग्या झाल्या कोरोनाच्या कटू आणि भीतीदायक आठवणी
  • भगवान गौतम बुद्ध यांची २५७० वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी, पन्हाळा तालुक्यातील बौद्ध लेणी, मसाई पठार, पांडवदरा आणि पोहाळे इथं बौद्ध प्रतिमांचं पूजन
  • सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी इचलकरंजीतील नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा
  • इचलकरंजीत खो-खो स्पर्धेला प्रारंभ, तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत १० संघ सहभागी
  • पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामगारांची सुरक्षा धोक्यात, तीन महिन्यात दोघांचा मृत्यू, तर दोघे जखमी, शिवसेन्एकडून आंदोलनाचा इशारा
  • टिप्पण्या

    news.mangocity.org