जिल्हा परिषद कृषी सभापती महेश नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 15 मे रोजी संगमेश्वर येथे शेतकरी मार्गदर्शन व आढावा सभेचे आयोजन

रत्नागिरी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी सभापती महेश नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 15 मे रोजी दुपारी बारा वाजता पंचायत समिती संगमेश्वर (देवरुख) येथे शेतकरी मार्गदर्शन व आढावा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा वेळी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांकडून देखील त्यांच्या काही समस्या किंवा प्रश्न काही असतील तर समजून घेऊन संबंधित प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही देण्यात येणार आहेत. 

महेश नाटेकर कृषी सभापती झाल्यानंतर प्रथमच अशा प्रकारच्या आगळ्यावेगळ्या शेतकरी सभांचे आयोजन करण्यात आले आहे जेणेकरून जिल्हा परिषदेच्या योजना तळागाळापर्यंत पोचल्या पाहिजेत हाच हेतू या सभे मागचा आहे. या सभेवेळी कृषी विभागाच्या संबंधित असलेले तसेच पशुवैद्यकीय विभागाच्या संबंधित असलेले सर्व अधिकारी, विस्तार अधिकारी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आदी अधिकारी उपस्थित राहणार आहे. तसेच या सभेवेळी ग्रामसेवक, विविध बँकांचे अधिकारी, वन विभाग, महावितरण, कृषी विज्ञान केंद्र लांजा आदी विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील बोलवण्यात आले आहे. तरी सदर सभेला संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या