100 हून अधिक ब्रेन ट्यूमर झालेल्या रुग्णांना जीवदान देणाऱ्या सोलारीस हॉस्पिटलच्या वतीने रत्नागिरी येथील आर बी शिर्के प्रशालेमध्ये रविवारी 17 मे रोजी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन
सोलारीस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे व रत्नागिरी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने न्यूरोलॉजी आणि मणक्यांच्या आजारांवरील मोफत वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना दीर्घकालीन डोकेदुखी, चक्कर येणे, फिट्स, नैराश्य, चिंता, पाठदुखी मानदुखी, मेंदू व मणक्यांच्या गाठी, आधी समस्या आहेत अशा रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अनुसया चारिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीट-डाऊन आणि रोटरी क्लब ऑफ अरबानिया, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे मोफत वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळी आर बी शिर्के हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिरासाठी नोंदणी करण्यासाठी श्री विवेक महाकाळ व पुरुषोत्तम पवार यांच्याशी संपर्क साधावा. यासंदर्भात सोलारीस हॉस्पिटलच्या वतीने आज रत्नागिरी येथे पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेमध्ये सोलारीस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. दीपक ऐवळे व डॉ. अमित ऐवळे यांनी सांगितले की डोकेदुखी, दृष्टी कमी होणे तसेच महिलांमध्ये होणारे हार्मोनल बदल या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ही मेंदूतील गाठीची लक्षणे असू शकतात. त्यासाठी योग्य तो तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. मेंदूतील गाठ काढण्यासाठी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक न्यूरो नेवीगेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, या तंत्रज्ञानाद्वारे नाकावाटे गाठ काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. ही अत्यंत कमी छेदाची शस्त्रक्रिया असून यामध्ये मेंदू अजिबात उघडला जात नाही. अत्याधुनिक न्यूरो नेवीगेशन तंत्रज्ञानाच्या साह्याने सोलारीस हॉस्पिटलने आतापर्यंत 100 हून अधिक मेंदूमध्ये गाठी झालेल्या रुग्णांना जीवदान दिले असून सर्व रुग्णांची प्रकृती अत्यंत चांगली आहे. हीच नेविगेशन तंत्रज्ञान प्रणाली मणक्यांच्या शस्त्रक्रियांसाठी देखील वापरण्यात येत आहे. ज्या तंत्रज्ञानामुळे मणक्यात स्क्रू अधिक अचूकपणे बसविण्यात मदत होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा