जिल्हाध्यक्ष पदापासून सर्व सेलचे पदाधिकारी नेमण्याचे अधिकार आता कार्यकर्त्यांच्या हातात, संघटन सृजन अभियानातून रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे, राहुलजी गांधी यांचे प्रयत्न, राजस्थानचे माजी मंत्री व ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी दानिश अबरार यांचे राजापूर येथील कार्यकर्त्यांना आवाहन
रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदापासून तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व विविध सेलच्या अध्यक्षपदाची निवड करण्याचे अधिकार आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या हाती देण्यात आले असून संघटन सृजन अभियानांतर्गत संघटना मजबूत करण्याचा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांचा मानस आहे. असे प्रतिपादन राजस्थानचे माजी मंत्री, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी, रत्नागिरी जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक दानिश अबरार यांनी राजापूर येथे आयोजित बैठकीवेळी केले.
राजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संघटन सृजन अभियानांतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दानिश अबरार मार्गदर्शन करत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, उत्तर रत्नागिरीच्या निरीक्षक श्रद्धा ठाकूर, पक्ष निरीक्षक आदित्य पाटील, राजापूरच्या नगराध्यक्षा ॲड. सौ. हुस्नबानू खलिफे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा ॲड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील मागील काही काळात झालेल्या निवडणुका आणि पक्ष कशा प्रकारे संघर्ष करत आहे आणि पक्षाचे कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करत आहेत याबाबत सविस्तर माहिती दिली.
या बैठकीवेळी काँग्रेसचे पदाधिकारी रघुनाथ आडीवरेकर, राजापूर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक वसंत आंबेलकर, देविदास राघव, मजीद सायेकर, तालुका उपाध्यक्ष दिलीप फोडकर, काँग्रेस शहर अध्यक्ष अजीम जैतापकर, राजापूर नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. वादक, नगरसेविका शबाना मुल्ला, अफरोज झारी, कशेळी ग्रामपंचायत सदस्य अनंत फणसे, गिरीश वादक, अमिना गडकरी, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते श्री तांबे गुरुजी आदी मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा