आजची बातमी पत्र

आज हसुर चंपू तालुका गडहिंग्लज येथे बसवेश्वर जयंती व शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली या गावचे प्रशासक माननीय सचिन शेंडगे यांच्या उपस्थितीत पार झाली गावातील 60 बैल जोड्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या तसेच या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पण सहभागी झाल्या होत्या
  • युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरागत
  •  तिथीनुसार येणारी जयंती कोल्हापुरात मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी, शिवछत्रपतींच्या जयघोषामुळे संपूर्ण शहर शिवमय
  • लेझीम, ढोल ताशांचा कडकडाट, डॉल्बीचा दणदणाट, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं, सजीव देखावे आणि जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात कोल्हापूर शहरात मोठ्या दिमाखात निघाल्या मिरवणुका
  • अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाजारपेठ हाऊसफुल्ल, सोने-चांदीच्या दुकानात प्रचंड गर्दी, तर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसह वाहनांच्या खरेदीतून, जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल
  • अक्षय तृतीयेनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या उत्सवमूर्तीची हिंदोळ्यावरील पूजा, तर मुख्य मूर्तीची विलोभनीय आरास, दर्शनासाठी भाविकांची दिवसभर मोठी गर्दी
  • ऑनलाईन गेमिंगचा नाद बेतला जीवावर, कोरोचीतील २४ वर्षीय तरुणानं गळफास घेऊन जीवन संपवलं, सुसाईड नोटमध्ये आर्थिक नुकसानीचा उल्लेख, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
  • महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त कोल्हापुरातील वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीनं निघाली भव्य शोभायात्रा, समाज प्रबोधनपर संदेश देणाऱ्या शोभायात्रेचं ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत
  • कसबा बावडातील जिल्हा पोलीस अधीक्षक निवासस्थानाच्या दारात भरधाव कारची रस्ता दुभाजकाला धडक, दुभाजकाचा कट्टा फुटून दुसऱ्या कारचाही अपघात, कारचं मोठं नुकसान
  • दुचाकी रॅलीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, जमावाच्या दगडफेकीत २ पोलीस जखमी, सरकारी वाहनांचीही नुकसान, ३० जणांवर गुन्हा, इचलकरंजीजवळ चंदूर इथली घटना
  • शिवाजी विद्यापीठ परिसरात आढळली पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुडाची जोडी, विद्यापीठ परिसरातील सुरक्षित आणि समृद्ध पर्यावरणावर शिक्कामोर्तब
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून घोषणांची एस.टी. सुसाट, रंकाळा बसस्थानकाचा शासकीय निधीतून, तर जिल्ह्यातील अन्य ६ बसस्थानकांचा खाजगीकरणातून होणार विकास

टिप्पण्या