मुख्य सामग्रीवर वगळा
आजच्या दिवसभरातील घडामोडी
- शासकीय कर्मचाऱ्यांचा संप: जुन्या पेन्शन योजनेसाठी पुकारलेल्या संपामुळे कामकाजावर परिणाम झाला असून, संपकरी कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्याची शासनाची भूमिका आहे.
- पोलीस महासंचालक दौरा: राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचा कोल्हापूर दौरा.
- गुन्हेगारी: विक्रम नगरमध्ये मुलाने बापाचा खून केल्याप्रकरणी संशयिताला अटक.
- शेअर बाजार: सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी वाढ. : हातकणंगले तालुक्यातील धुळोबा देवस्थानच्या रस्त्याची दयनीय अवस्था. : व्हाइट आर्मीची वैद्यकीय सेवा, रुई बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू, वीज दर वाढीविरोधात चेंबर ऑफ कॉमर्सचा इशारा आणि पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत आंदोलन..
- ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची घेतली आमदार रोहित पवार यांनी सांत्वनपर भेट.
- पोलीस भरती परीक्षेत कोल्हापूरच्या वागरे पाटील फौंडेशनचा डंका, तब्बल ११३ उमेदवारांनी मारली बाजी.
- कंत्राटी कामातील हिस्सा आणि हिशोबावरून महिला उपसरपंचाच्या पतीकडून तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न, कणेरी इथल्या शिंदे कॉलनीतील खळबळजनक घटना.
- कोल्हापूर जिल्हा परिषदेत विषय समिती सदस्यांच्या निवडी बिनविरोध, नव्या-जुन्या सदस्यांना संधी देताना सर्वच पक्षाच्या नेत्यांची लागली कसोटी.
- जागा वाटपात पक्षपातीपणा झाल्याचा आरोप करत काँग्रेस गटनेते एकनाथ पाटील यांनी दिला राजीनाम्याचा इशारा.
- राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेल्या कोल्हापूर ते मिरज रेल्वे सेवेचा १३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा, कोल्हापूरच्या रेल्वेस्थानकावर झाला विशेष कार्यक्रम.
- कुणाचाही हस्तक्षेप खपवून न घेता नागरिकांना समान पद्धतीने पाण्याचे वाटप होईल याची दक्षता घ्या, आमदार राजेश क्षीरसागर यांची सूचना.
- नुकसान भरपाईची रक्कम मिळावी, यासाठी वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्यग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू.
- महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांचा झाला सत्कार.
- पारंपारिक वाद्यं, धनगरी ढोल, डॉल्बीचा दणदणाट आणि डोळे दिपवणाऱ्या लाईट्सच्या झगमगाटात संयुक्त बुधवार पेठेच्यावतीने निघाली शिवजयंती मिरवणूक.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा