आजच्या घडामोडी

  • १५ तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या मुलाची शिरोलीतील नराधम शाहीद सनदीला पोलीस कोठडी, तर फरार साथीदार शाहरुख देसाईला कराडमधून अटक
  • जिहादी मानसिकतेच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करा, शिरोली गाव बंद ठेवत ग्रामस्थांनी सनदीच्या घराचा पाणी आणि वीज पुरवठा तोडला, कुटुंबियांना गावातून हाकलण्याचा इशारा
  • धरणातील पाणी साठ्यातील घट आणि पावसाळा उशीरा सुरू होण्याची शक्यता यामुळे ३० एप्रिलपासून कोल्हापूर शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार, पाणी जपून वापरण्याची गरज
  • तप्त उन्हाळ्यात हवा तापली, पण कोल्हापूर महापालिकेचा थंड कारभार, ३५ लाख रुपये खर्चुन उभारलेली शहरातील स्प्रिंकलर यंत्रणा बंदच, मलिदा खाल्लेले अधिकारी गपगार...
  • आग ओकणारा सुर्य आणि चटके देणारं ऊन यामुळे महाराष्ट्र तप्त, सलग दुसऱ्या दिवशी अकोला ठरलं देशातील सर्वात उष्ण शहर, पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम
  • उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज
  • यंदा अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल, केवळ पाच फेऱ्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचं नियोजन, मुलींसाठी होणार स्वतंत्र विशेष प्रवेश फेरी
  • गुन्ह्यातील गाडी परत देण्यासह तपासात मदत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी भुदरगड ठाण्यातील हवालदार सुभाष चौगले आणि खाजगी व्यक्ती मुस्ताक शेखला रंगेहाथ पकडलं
  • मंत्री आले आणि गेले... कोल्हापुरातील मध्यवर्ती एस. टी. बस स्थानकातील गैरसोयी आणि असुविधा कायम, परिवहन मंत्र्यांचा दौरा म्हणजे निव्वळ सोपस्कार.
  • शिवाजी विद्यापीठामध्ये 'द मिरॅकल ऑफ मिलेटस् लोकल ग्रेन्स मॉडर्न वंडर्स' पुस्तकाचे प्रकाशन.
  • माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा मंडळाचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर, दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता.
  • नंबर लावून १५ दिवस उलटले तरी गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांकडून गोंधळ, कोल्हापुरातील सुर्वेनगर इथल्या गॅस एजन्सीमधील प्रकार.
  • आहारात तृणधान्याचा समावेश केल्यास अनेक आजार राहतील दूर, निसर्गाने दिलेला ठेवा रोजच्या जगण्यात वापरण्याची गरज, डॉ. संदीप पाटील यांचं मत.
  • भागीरथी संस्थेच्यावतीने झालं आईस्क्रीम आणि सरबत बनवण्याचे प्रशिक्षण शिबीर.
  • छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती देणाऱ्या बागेश्वरधाम बाबाच्या विरोधात शिवभक्तांमध्ये संतापाची लाट.
  • लव्ह जिहादच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिसांनी सखोल चौकशी करून धर्मांध व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, सकल हिंदू समाजाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी.

टिप्पण्या