माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार नारायण राणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त उत्तम आयुष्य, आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत रायगडचे खासदार सुनील तटकरे देखील उपस्थित होते. 

टिप्पण्या

news.mangocity.org