मुख्य सामग्रीवर वगळा
आजचे बातमी पत्र
- रविवारी अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार, कोल्हापूरसह राज्यातील १६ जिल्ह्यात गारपिटीसह पावसाची शक्यता.
- करवीर तालुक्यातील केर्ले येथील मित्राच्या खून प्रकरणी संदीप मानेला न्यायालयाने सुनावली आजीवन कारावासाची शिक्षा, २०२२ साली घडली होती खुनाची घटना.
- पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलकांनी इचलकरंजीतील काळ्या ओढ्यात घातलेला बांध फुटून प्रदूषित पाणी पुन्हा पंचगंगेत.
- नोकरीच्या आमिषानं महिलेची साडेचार लाखांची फसवणूक, वारणा कोडोलीतील एकाला अटक.
- इचलकरंजी इथं समव्यवसायिकांमुळं कर्जबाजारी झालेल्या ५५ वर्षीय कॉन्ट्रॅक्टरनं सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल.
- महिला आरक्षण लोकसभेत अपयशी ठरल्यानं शिंदे शिवसेना महिला आघाडीच्यावतीनं काँग्रेस विरोधात केली कोल्हापुरात जोरदार प्रदर्शनं.
- फुलेवाडी रिंगरोडवरील साक्षी दलबंजन या तरुणीची मुंबई रेल्वे पोलीस पदी निवड, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मिळवलेल्या यशाबद्दल परिसरात जल्लोष.
- तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती, देखावे-विद्युत रोषणाई आणि भगव्या पताकांमुळं शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अवघं कोल्हापूर बनलं शिवमय.
- अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यापूर्वीच वेतन बंद केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्यावतीने झालं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन.
- इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरून विरोधकांकडून नागरिकांची दिशाभूल, पण उन्हाळ्यातही शहराला मुबलक पाणी पुरवठा होणार, महापौर उदय धातुंडे यांची ग्वाही.
- उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीमुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरून होणारा पाणी पुरवठा २० एप्रिल रोजी होणार खंडित.
- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ, महागाई भत्ता पोहोचला ६० टक्क्यावर, ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६४ लाख पेन्शनर्सना मिळणार लाभ.
- संवाद कौशल्याच्या माध्यमातून करिअरमध्ये प्रगती आणि स्पर्धेत टिकण्यासाठी डॉ. सुनिता दळवाई यांचे पुस्तक सर्वांसाठी मार्गदर्शक, सौ. अरुंधती महाडिक यांचे प्रतिपादन.
- आमदार राजेश क्षीरसागर यांची कार्यतत्परता आणि लोकप्रियता पाहून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले वैफल्यग्रस्त, शिवसेना शिंदे गटाचा पलटवार.
- कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात.
- कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावरील रस्त्यावर शुक्रवारी झालेल्या दुचाकी अपघातातील गंभीर जखमी गौतम गायकवाड यांचा उपचारा दरम्यान मृत्यू.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा