दापोलीत डुप्लिकेट इलेक्ट्रिक वायर्सची विक्री? दापोली बाजारपेठेतील एका दुकानदारावर गुन्हा दाखल

दापोली बाजारपेठेतील एका इलेक्ट्रिक वायर विक्रीच्या दुकानदाराने आपल्या स्वतःच्या फायद्याकरिता पॉलिकॅब नावाच्या कंपनीने इलेक्ट्रिकल्स वायर तयार केल्यासारखे हुबेहूब दिसणाऱ्या नकली वायर एकूण किंमत सुमारे 1 लाख 38 हजार एवढा मुद्देमाल स्वतःच्या आर्थिक फायदा करिता विक्रीसाठी दुकानांमध्ये ठेवून वरील नमूद कंपनीच्या कॉपीराईट ट्रेडमार्क स्वामित्वाच्या मूळ हक्कांचे उल्लंघन केले म्हणून दापोली पोलीस ठाणे येथे दिनांक 15 एप्रिल रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 63/2026 मध्ये कॉपीराईट ट्रेडमार्क 1957 सुधारित अधिनियम 1984 आणि 1994 चे कलम 51, 63 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बनावट वायर विक्रेत्यांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली आहे.

टिप्पण्या

news.mangocity.org