श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्यूटर्सचे सर्वेसर्वा रुपेश रामचंद्र कोलते यांना मुंबईतील यशवंतराव चव्हाण फाउंडेशनचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२६ जाहीर

यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्याकडून “यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2026”*हा यंदाचा सर्वांत मोठा आणि मानाचा पुरस्कार कोकणातील, राजापूर तालुक्यातील युवा उद्योजकाला जाहीर झाला आहे. मूळचे राजापूर तालुक्यातील, डोंबिवली येथील श्री स्वामी समर्थ डिस्ट्रिबुटर्स चे सर्वेसरा रूपेश कोलते यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रुपेश कोलते सांगतात की, “श्री. स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटर” हा फक्त व्यवसाय नाही. तो एक विश्वास आहे. एक नातं आहे आणि त्या विश्वासाची आज मिळालेली ही सर्वात मोठी पावती आहे. शून्यातून सुरुवात करून, प्रामाणिकपणा, मेहनत आणि सातत्य यावर विश्वास ठेवत आज इथपर्यंत पोहोचलो आणि हा पुरस्कार म्हणजे त्या प्रवासाची एक सुंदर ओळख आहे. मी व्यवसाय हा मुळात 60% व्यवसाय आणि 40% सामाजिक बांधिलकी या तत्त्वावर करतो. व्यवसायाच्या माध्यमातून समाजाला काहीतरी परत देण्याचा नेहमी प्रयत्न केला. विशेष म्हणजे सोलर स्ट्रीट लाईट या क्षेत्रात ग्रामीण भागात तसेच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करत, लोकांपर्यंत सौर ऊर्जेचा संदेश पोहोचवण्याचं काम सातत्याने करत आहे. या सामाजिक भावनेतून केलेल्या कार्याची दखल घेऊन रुपेश रामचंद्र कोलते यांना यशवंतराव चव्हाण फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर झाला आहे. रुपेश कोलते यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. 

टिप्पण्या

news.mangocity.org