राजापुरातील अमृत तांबडे यांचा बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अपघात, उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आले असल्याची माहिती
राजापूर वरची पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते अमृत तांबडे यांचा बुधवारी रात्री साडेअकरा पावणे बारा वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई गोवा महामार्गावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या बाजूला अपघात झाला असून त्यांच्या मेंदू मधून मोठा रक्तस्त्राव सुरू झाला आहे. उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना रत्नागिरीतील चिरायू हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी अमृत तांबडे यांना चांगली येते पुढील उपचारासाठी नेले असल्याची माहिती मिळत आहे.
रात्री 10, 11 वाजवण्याच्या सुमारास अमृत तांबडे हे वरची पेठ मारुती मंदिर येथे होते. तिथे ते काही मुलांशी गप्पा मारून झाल्यानंतर ते वरची पेठ मार्गे जुन्या मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्यावरून जकात नाका दरम्यान असताना सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या नजीक वळणावर अपघात झाला. त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. ब्रेन हॅमरेज झाल्याचे कळत आहे. चिरायू हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना तिथे स्वतः घेता येत नसल्यामुळे ऑक्सिजन लावण्यात आला होता. चिरायू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र अपघात गंभीर असल्यामुळे नातेवाईकांनी सांगली येथे उपचारासाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान अमृत तांबडे यांचा हा स्वतःहून झालेला अपघात होता की अपघात घडवून आणला होता अशा उलट सुलट चर्चा सुरू असतानाच पोलिस प्रशासनाची प्रतीक्रिया आली आहे. तो अपघातच आहे. संशयस्पद असे आम्हाला काही वाटत नाही. परंतु त्यांच्या डोक्याला मार लागला असून रक्तस्त्राव खूप होत होता अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा