आजच्या ताज्या बातम्या

  • गोकुळ दूध संघावर ५ मे पासून प्रशासकराज येण्याचा मार्ग मोकळा, विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास कोल्हापूर सर्किट बेंचचा स्पष्ट नकार, वादग्रस्त संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यावर निवडणूक होणार.
  • शिरोलीतील त्या तरुणांना प्रशिक्षण आणि मालेगावमधून आर्थिक रसद पुरवली जात असल्याचा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप, शिरोली प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी.
  • काळम्मावाडी धरण परिसरातील काळोखेच्या डोहात बुडून १६ वर्षीय युवकाचा मृत्यू, धोकादायक डोहात आजपर्यंत सुमारे १२ जणांचा मृत्यू.
  • करवीर तालुक्यातील खुपीरे इथल्या सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा, लॉज मॅनेजरसह चौघांना अटक, १ लाख ३९ हजार रुपयांचे साहित्य जप्त.
  • कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स ५८२ अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे ४.७९ लाख कोटी रुपयांचे नुकसान.
  • इचलकरंजीहून लग्नासाठी चाललेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघात, ११ जण जखमी.
  • कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत चुरशीने मतदान, ४ हजार पैकी सुमारे २ हजार ५४२ मतदारांनी बजावला हक्क, सायंकाळी उशिरा निकालाची प्रक्रिया सुरू.
  • स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' या गायन स्पर्धेत कोल्हापूरची शुभ्रा खाडे पोहोचली अंतिम फेरीत, अभिनेते सचिन पिळगावकर यांनी कोल्हापुरात शुभ्राची भेट घेऊन दिल्या शुभेच्छा, दोघांच्या गाण्याची मैफलही रंगली.
  • महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्त दि. १ मे रोजी सुट्टी
  • आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाण्यातील निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा भाकप कार्यकर्त्यांचा प्रयत्न पोलिसांनी रोखला; मोर्चास्थळी पोहोचण्याआधीच कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
  • श्री अंबाबाई मंदिर परिसरातील भूसंपादनासाठी २ मे पासून होणाऱ्या पहिल्या टप्प्यात १३१ मिळकतींचे होणार सर्वेक्षण.
  • श्रीमद् जगद्गुरु आद्य शंकराचार्यांच्या जयंती उत्सवात करवीर पीठाच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान.
  • तब्बल चार वर्षांनंतर झाली जिल्हा परिषदेची स्थायी सभा; आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी भरती आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीला दांडी यावर झाली वादळी चर्चा.
  • उमा टॉकीज परिसरातील नागरिकांच्या वैयक्तिक पाणी कनेक्शनची पाईप ड्रेनेजमध्ये फुटल्याची शक्यता; दूषित पाण्यासंबंधी महापालिकेने स्पष्ट केली भूमिका.
  • शिरोली प्रकरणातील हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्यावर भरदिवसा रिव्हॉल्व्हर रोखून धमकी; शिरोलीत शेकडो कार्यकर्त्यांची बुधवारी रात्री पोलीस ठाण्यासमोर गर्दी झाल्याने तणाव.
  • "पुस्तकाशी मैत्री केली तर मुलांचे भविष्य चांगले घडेल", साहित्यिक डॉ. राजन गवस यांचे प्रतिपादन; कोल्हापुरातील विकास विद्यामंदिर हायस्कूलतर्फे झाले बाल साहित्य संमेलन.
  • विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी इचलकरंजीतील सुरेश हाळवणकर यांना डावलल्याने नगरसेवक आणि पदाधिकारी संतप्त.
  • पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजीत नियुक्त समिती कार्यरत; काळ्या ओढ्यावर बांध घालण्याचे कामही सुरू.
  • लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार करणाऱ्या फैयाज शेखला पोलीस कोठडी.

टिप्पण्या