OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA
Government of India MAHMAR/2011/39536
7030166666 47 years in News, 25 years in Reporting, 14 Years In Daily News paper owner Editor,- Prajkta Pravin Kine, Founder Pravin R Kine www.idcard.mangocity.org, www.fresh.mangocity.org, www.news.mangocity.org
मुख्यमंत्र्यांचा पुतळा दहन करण्याचा डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला, पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यातील धुमश्चक्रीमुळे बिंदू चौकात तणावाचे वातावरण.
रंकाळ्यातील दूषित पाणी, मासे आणि जलचरांच्या जीवावर, रंकाळा टॉवरच्या बाजूला मेलेल्या माशांचा तरंग.
जीवनश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात रेशन बचाव समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, मागण्यांची पूर्तता झाली नाही तर पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा.
करोडो रुपयांची बिलं थकल्याने कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघाच्यावतीने उग्र आंदोलन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला ठोकलं टाळं, १ मे नंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार.
विधानपरिषद निवडणुकीचे पडघम वाजले, कोल्हापूर जिल्ह्यातून नेमक्या कुणाला विधान परिषदेवर संधी मिळणार, याबाबत कमालीची उत्सुकता.
पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी वस्त्रोद्योगातील विविध घटक, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका अधिकाऱ्यांची आंदोलन अंकुश संघटनेबरोबर संयुक्त बैठक, आंदोलकांकडून अधिकारी धारेवर.
केंद्र आणि राज्य सरकारच्या जाचक अटी आणि नियमांच्या विरोधात राज्यभरातील ८५ हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर, जिल्ह्यातील सुमारे २ हजार कृषी सेवा केंद्र बंद राहिल्याने शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता.
लग्नमंडपात ऐनवेळी नवरीचा लग्नास नकार, एजंटांच्या माध्यमातून ठरलेल्या विवाहावरून कागल तालुक्यातील मुरगुडमध्ये खळबळ.
केद्रातील आणि राज्यातील सक्षम भाजप सरकारमुळेच कोल्हापूरची सर्वांगीण विकासात घोडदौड, औद्योगिक विस्तारासाठी उद्योजकांनी प्रयत्नशील राहावं, खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहन.
तळाशी गावात सरपंचांवर जीवघेणा हल्ला झाल्यानं तणावपूर्ण वातावरण, राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल होऊन तिघे जण ताब्यात.
इचलकरंजीतील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी महापौर उतरले रस्त्यावर, अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देण्यासाठी केली पाहणी.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडील कंत्राटदारांना बिलं मिळण्याची प्रक्रिया झाली सोपी, अनावश्यक ११ टेबलची संख्या केली कमी.
स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यासाठी नगरसेवक उतरले स्वच्छता मोहिमेत, नागरिकांना सोबत घेत फुलेवाडी मुख्य रस्त्याची केली स्वच्छता.
कर्नाटकातील एकसंबा इथं चेन स्नॅचिंग केल्याच्या आरोपाखाली कोल्हापुरातील शिवाजी पार्कातील तरुणाला संशयावरून घेतलं ताब्यात, स्थानिकांनी पंचनाम्यावेळी केला पोलिसांना विरोध.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महापालिकेची आढावा बैठक संपन्न, प्रलंबित विषयांवर कालावधी निश्चित करून त्याची निर्गत करावी, पालकमंत्र्यांचे आदेश.
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावात मिरवणुकीतील वादावादीतून दोन समाजात हाणामारीमुळं तणाव, १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा