रत्नागिरीतील एलईडी मासेमारी वरील कारवायांबद्दल, मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकामे पाडल्याबद्दल तालुका आणि जिल्हा पर्सेसीन नेट संघटनेकडून महायुती सरकारचे मानले जात आहेत आभार? फिशिंग इंडस्ट्री मध्ये जोरदार चर्चा

रत्नागिरी जिल्ह्यातील एलईडी व अवैध पद्धतीने होत असलेल्या मासेमारीच्या विरोधामध्ये मत्स्य विभागाने गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या काही कारवाया केल्या त्याबद्दल रत्नागिरी तालुका आणि जिल्हा पर्ससीन नेट मच्छीमार संघटनेच्या वतीने विद्यमान महायुती सरकारचे आभार मानले जात आहे अशी चर्चा फिशिंग इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे. 

मत्स्य विभागाच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांमध्ये अनधिकृत पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. एलईडी मासेमारी होऊ नये याकरिता कठोर कारवाया केल्या जात आहे तसेच दंडही आकारला जात आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक पद्धतीने होत असलेल्या मच्छीमारांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. अनधिकृत एलईडी मासेमारीमुळे पारंपारिक व छोटे व्यवसायिकांवर मच्छी व्यवसायामध्ये फार मोठे विपरीत परिणाम होत होते त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानेला सामोरे जावे लागत होते. 

मात्र विद्यमान महायुती सरकारच्या धोरणांमुळे मत्स्य विभागाने धडक कारवाया केल्या. मिरकर वाडा बंदरावरील अनधिकृत टपऱ्या व अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. अनधिकृत मत्स्य व्यवसायावर नजर ठेवण्यासाठी काही समुद्रकिनाऱ्यावर ड्रोन कॅमेरे सुद्धा लावण्यात आले. याचा परिणाम म्हणून मच्छीमारीच्या व्यवसायावर चांगल्या पद्धतीने झाला असून छोट्या मच्छी व्यवसायोजनांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याची चर्चा सुरू आहे. 

याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी तालुका व जिल्हा पर्सेसिन नेट मच्छीमारी संघटनाच्या वतीने विद्यमान महायुती सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मिरकर वाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामे पाडण्यात आल्यामुळे इथल्या स्थानिक मच्छीमारांना चांगला फायदा झाल्याचे बोलले जात आहे आणि याबाबत देखील पर्ससीन नेट मच्छीमार संघटनेच्या वतीने देखील आभार व्यक्त केले जात असल्याची चर्चा सुरू आहे.

टिप्पण्या