जैतापूर खाडी पात्रात अवैध वाळू उत्खनन, प्रशासनाचे दुर्लक्ष, रूपेंद्र कोठारकर यांची लेखी तक्रार

राजापूर तालुक्यातील जैतापूर खाडी पात्रामध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाविरोधात रूपेंद्र विलास कोठारकर यांनी राजापूर तहसील कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे.

रूपेंद्र कोठारकर यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, धाऊलवल्ली तरबंदर तसेच जैतापूर आगरवाडी येथे अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. दिनांक २२ एप्रिल रोजी प्रशासनाकडे तोंडी तक्रार दिली होती. ती गोष्ट संबंधित वाळू व्यावसायिकांना समजली. त्यानंतर ते व्यावसायिक माझ्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या माझ्या भावाच्या टपरीच्या ठिकाणी येऊन संबंधित वाळू व्यावसायिकांनी घेरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

आम्ही सर्व अधिकारी, कर्मचारी यांना पैसे पुरवत आहोत, तुला काय करायचं ते करून घे. सर्व वरिष्ठ अधिकारी आमच्या खिशात आहेत. आमचे कुणीही काहीही वाकडे करू शकत नाहीत. अशी त्यांची उत्तरे असल्याने भविष्यात मला किंवा माझ्या कुटुंबाला धोका निर्माण झाल्यास सदर अनधिकृत वाळू व्यावसायिक जबाबदार असतील याची दखल आपण घेण्यात यावी. तरी या सर्व घटने प्रकरणी उचित कार्यवाही करावी अशी मागणी आपल्या या निवेदनाद्वारे रूपेंद्र कोठारकर यांनी केली आहे.

टिप्पण्या