आजचे बातमी पत्र
शिरोळ तालुक्यातील दानोळीमध्ये २५ लाखांच्या खंडणीसाठी तरूण व्यावसायिकाचं अपहरण आणि खून, जयसिंगपूर पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप
शिरोळ तालुक्यातील तेरवाडजवळ भीषण अपघात, अब्दुललाटमधील ५८ वर्षाचे उत्तम कांबळे हे दुचाकीस्वार ठार, तर अन्य एकजण गंभीर जखमी
सातारा ते कागल महामार्गाच्या सहापदरीकरणाचं काम संथगतीनं, कागल ते पेठ नाका रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा, ठेकेदार गायब तर कर्मचारी थकीत पगाराच्या प्रतिक्षेत
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी साजरी, भारतीय राज्य घटनेच्या शिल्पकाराला अभिवादन करण्यासाठी बिंदू चौकात लोटला जनसागर
९ वर्षाच्या आदेश गवळीनं मिळवलं डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत लख्ख यश, दीड लाख विद्यार्थ्यांतून रौप्य पदक मिळवलेल्या आदेशला विज्ञानासह पर्यावरणाचंही भान
इचलकरंजीतील पंचगंगा नदी पात्र जलपर्णीनं व्यापलं, नदीला आलं हिरव्यागार मैदानाचं स्वरूप, दरवर्षी उन्हाळ्यातील समस्या कायम
राधानगरी तालुक्यातील तरसंबळे गावातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, पती आणि सासू-सासऱ्यांना अटक, तिघांनाही न्यायालयानं सुनावती १८ तारखेपर्यंत पोलिस कोठडी
गावातील पारावरच्या गप्पा म्हणजे सध्याच्या व्हर्चुअल जगातील संवादाचा आणि आपुलकीचा वारसा, नामशेष होत चाललेल्या पारकट्टा संस्कृतीबद्दल फ्रेश न्यूज चा आढावा
- १४ एप्रिल १९४४ च्या भीषण दुर्घटनेतील अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या हौतात्म्याबद्दल पाळला जातो सेवा दिन, कोल्हापूर अग्निशमन दलाकडून शहीदांना मानवंदना
- गोकुळ संबंधी सध्या सुरू असणाऱ्या राजकीय घडामोडींची माहिती आपण मुंबईतच घेऊ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
- खंडणी देण्यास नकार दिल्यानं इचलकरंजीतील अट्टल गुन्हेगारांकडून मारहाण आणि घरावर हल्ला, ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
- इचलकरंजीत डॉ. आंबेडकर जयंती दरम्यान दोन गटात झालेल्या मारहाणीवेळी पोलिसासह चौघे जखमी, १४ जणांवर गुन्हा
- कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमानंतर करिअरच्या भरपूर संधी, सीएस पवन चांडक यांची माहिती
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक माणगाव इथं गर्दीचा महासागर, भिम ज्योत नेण्यासाठी अनुयायांची रांग
- बाजारातील गर्दीत सापडलेलं १२ ग्रॅमचं मंगळसूत्र परत करून तीन महिलांनी जिंकली ग्रामस्थांची मनं, कागलमधील घटनेतून प्रामाणिकपणाची सोन्याची भावना अधोरेखीत
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली राज्यघटना म्हणजे अमुल्य देणगी, खासदार धनंजय महाडिक यांची भावना १६ एप्रिल पासून शाहुपूरी जिमखाना मैदानावर होणार राजेश चषक टी- ट्वेंटी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा