आजचे दिनविशेष

             रंकाळा चौपाटीवरील शालिनी पॅलेस समोरच्या उद्यानाची भीषण अवस्था, कचऱ्याच्या साम्राज्यासह ओपन जिम साहित्यांची मोडतोड, तर लहान मुलांची खेळण्यांचीही दुरावस्था

            आठवडयाच्या शेवटी शेअर बाजाराची उसळी, सेन्सेक्स ९१८ आणि निफ्टी २७५ अंकांनी वाढला, डॉलरच्या तुलनेत रुपया १० पैशांनी वाढल्यानं महागाई कमी होण्याची आशा

         महामार्गाशी निगडीत अनेक विषयांबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली आढावा बैठक,              बास्केट ब्रिजसह सर्व उड्‌डाण पुल आणि रस्ते रूंदीकरणाचं काम वेळेत आणि दर्जेदार पध्दतीनं व्हावं, खासदार महाडिक यांची सूचना

             सोप्या आणि प्रभावी होमिओपॅथी उपचार पध्दतीचं महत्व आणि उपयुक्तता सांगणारं बी न्यूजचं विशेष वृत्त, जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त...
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा ५० टक्केपेक्षा अधिक, मान्सून लांबला तरी पाणी टंचाई उद्भवणार नाही, यासाठी पाटबंधारे विभागाचं नियोजन
            लग्नाचं आमिष दाखवून पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे इथं १ लाख ८२ हजारांची फसवणूक, पन्हाळा पोलिसांकडून दोघांना अटक, न्यायालयानं सुनावली पोलिस कोठडी
        केंद्रीय राखीव पोलिस दलाचे हवालदार सागर शंकर पाटील यांच्या अपघाती निधनामुळं सुळंबी गावावर शोककळा.                                                          वैयक्तिक माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी आधारकार्डवर येणार क्यूआर कोड, नवा प्रस्ताव यूआयडीएआयच्या विचाराधीन
        गूढ आणि धक्कादायक कहाणीचा थरार उलगडणार सालबर्डी या नव्या चित्रपटातून, १७ एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होणार

इचलकरंजीतील महासत्ता चौकात खोदलेल्या रस्त्यामुळं वारंवार होतीय वाहतूक कोंडी, नागरिक वैतागले

शिरोली औद्योगिक वसाहतीमधील अनधिकृत अतिक्रमणांवर धडक कारवाई, शिरोलीतील अनेक रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

वैद्यकीय बीलं मंजुर करण्यासाठी लाच घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तीन दिवसात कारवाई करावी, ठाकरे गट शिवसेनेची मागणी
           कोल्हापूरसह राज्यातील आशा आणि गटप्रवर्तक महिला आरोग्यदूतांचं मानधन गेले सहा महिने थकीत, कष्ट करूनही मानधन मिळत नसल्यानं कौटुंबिक गरजा आणि स्वप्नंही गोठली
                   विविध मागण्यांसाठी इचलकरंजी महापालिकेतील उपायुक्त दालनात नगरसेविकेसह समर्थकांचा ठिय्या, उपायुक्त कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा.

टिप्पण्या